Adventure Tourism Activities | ‘साहसी पर्य़टन उपक्रम धोरण’ लागू, ट्रेकिंग करणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक; ‘या’ ठिकाणी करा नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Adventure Tourism Activities | राज्यातील साहसी पर्य़टन उपक्रम राबविणाऱ्या आयोजकांकरिता नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सुरक्षित साहसी पर्य़टनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्यासाठी ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ लागू करण्यात आले आहे. सध्या आयोजित होणाऱ्या व भविष्यात नव्याने सुरू होणाऱ्या जमीन, हवा व पाणी यावरील सर्व साहसी पर्यटन उपक्रमांसाठी हे धोरण (Adventure Tourism Activities) लागू राहणार आहे.

 

जिल्ह्यात काही साहसी पर्यटन केंद्र चालक झिपलाइन (Zipline), ट्रेकिंग (Trekking), वॉटर स्पोर्ट्स (Water Sport) इत्यादी उपक्रम विनानोंदणी राबवत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा (Department of Tourism and Cultural Affairs) 24 ऑगस्ट 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार साहसी पर्य़टन उपक्रम धोरण (Adventure Tourism Activities) लागू करण्यात आले आहे. यानुसार साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्या संस्थांनी तातडीने नोंदणी करावी. यापुढे विनानोंदणी उपक्रम चालवले अथवा लावत असल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या सहायक संचालक सुप्रिया करमरकर-दातार (Director Supriya Karmarkar-Datar) यांनी सांगितले.

 

कोठे आणि कशी करायची नोंदणी?
साहसी उपक्रम राबविणाऱ्या आयोजकांनी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर पाचशे रुपयांचे
चलन https://gras.mahakosh.gov.in/echallan या लिंकवर भरून नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी विभागीय पर्यटन कार्यालय, एमटीडीसी कार्यालय शेजारी, ससून रुग्णालयाशेजारी,
पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Adventure Tourism Activities | registration now mandatory for group trekkers where and how to- register

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’ – चंद्रकांत पाटील

Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

Sharad Pawar | ‘शाई फेकणे चूक; पण चंद्रकांत पाटलांच्या विधानाकडे…’; काय म्हणाले शरद पवार