ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व साहित्यिक अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले आहे.

पुण्यात विधी महाविद्यालयात गावाकडून शिकण्यास येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांचे ते आधारवड, मार्गदर्शक व आधारस्तंभ होते. ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे माजी अध्यक्ष, सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांना पोलीसनामा ऑनलाइनकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी सहभागी आहेत. त्यांच्या जाण्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे.