प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंहच्या सल्ल्यावर भडकली निर्भयाची आई, म्हणाल्या – ‘अशाच लोकांमुळं वाचतात बलात्कारी’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रसिद्ध वकील इंदिरा जयसिंह यांनी आवाहन केले की निर्भयाची आई आशा देवी यांनी आपल्या मुलीच्या दोषींना फाशीची शिक्षा माफ करावी. इंदिरा जयसिंह यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे उदाहरण दिले आहे आणि सांगितले आहे की सोनिया यांनी ज्या पद्धतीने राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनीला माफ केले तसेच उदाहरण आशा देवी यांनी सादर करावे.

इंदिरा जयसिंह म्हणाल्या की आशा देवी यांचे दु:ख आणि वेदना मी समजू शकते, परंतु मी मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. आशा देवी यांनी जयसिंह यांच्या आवाहनावर संतापजनक प्रतिक्रिया देत सांगितले की इंदिरा जयसिंह मला सल्ला देणाऱ्या कोण आहेत, आशा देवी म्हणाल्या की अशा लोकांमुळेच बलात्कारातील पीडितांना न्याय मिळत नाही.

1 फेब्रुवारीला फाशी –
निर्भया हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींना आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. सत्र न्यायालयाने दोषींविरोधात आज डेथ वारंट जारी केले आहे. त्यानुसार 22 जानेवारीला निर्भयांच्या दोषींना होणारी फाशीची शिक्षा आता 1 फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. परंतु दोषी मुकेश यांची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे.

बलात्कारी दोषींना माफी द्या –
इंदिरा जयसिंह म्हणाल्या की आशा देवी यांचे दु:ख आणि वेदना मी समजू शकते, परंतु मी मृत्यूदंडाच्या विरोधात आहे. इंदिरा जयसिंह यांनी आवाहन केले की निर्भयांची आई आशा देवी यांनी आपल्या मुलीच्या दोषींना फाशीची शिक्षा माफ करावी. इंदिरा जयसिंह यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे उदाहरण दिले आहे आणि सांगितले आहे की सोनिया यांनी ज्या पद्धतीने राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनीला माफ केले तसेच उदाहरण आशा देवी यांनी सादर करावे.

मला सांगणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण –
आशा देवी यांनी जयसिंह यांच्या आवाहनावर संतापजनक प्रतिक्रिया देत सांगितले की इंदिरा जयसिंह मला सल्ला देणाऱ्या कोण आहेत, त्या म्हणाल्या की अशा लोकांमुळे बलात्कारातील पीडितांना न्याय मिळत नाही. त्या सर्वोच्च न्यायालयात मला अनेकदा भेटल्या. परंतु त्यांनी एकदाही माझी विचारपूस केली नाही. त्या दोषींच्या बाजूनेच बोलत आहेत. आशा देवी यांनी गंभीर आरोप केला की असे लोक बलात्काऱ्यांना समर्थन देऊन स्वत:चे पोट भरत आहेत. त्यामुळे पीडितांना न्याय मिळत नाही.

गांधी कुटूंबाने केली होती शिक्षा माफ –
नलिनी हिला राजीव गांधी हत्याकांडातील दोषी ठरवण्यात आली होती. न्यायालयाने तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. परंतु त्यानंतर तिची शिक्षा कमी करुन जन्मठेप करण्यात आली. 1991 मध्ये तिला या प्रकरणी तुरुंगात पाठवण्यात आले. ती 26 वर्षे तुरुंगात होती. 2008 मध्ये प्रियंका गांधी यांनी तिची भेट देखील घेतली होती, गांधी कुटूंबाने तिला माफ केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/