निर्भया केस : दोषी मानसिक रूग्ण, आईला सुद्धा ओळखत नाही, विनयच्या वकीलाचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गँगरेप आणि मर्डर केस आता एका वेगळ्याच वळणावर आले आहे. पटियाला हाऊस कोर्टाने दाखल याचिकेवर गुरूवारी सुनावणी करताना म्हटले की, दोषी विनयची मानसिक स्थिती खुप बिघडलेली आहे. न्यायालयानुसार विनयची स्थिती एवढी बिघडली आहे की त्याने भिंतीवर डोके आपटून स्वताला जखमी केले आहे. दोषीचे वकील ए.पी सिंह यांच्या या याचिकेवर कोर्टाने तिहार कारागृहाला विनयवर उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आता पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.

दोषी विनयचे वकील एपी सिंह यांचे म्हणणे आहे की, विनयची मानसिक स्थिती एवढी खराब आहे की त्याने आपल्या डोक्याला दुखापत करू घेतली आहे. कोर्टाला विनंती आहे की कारागृहाकडून याबाबत माहिती घ्यावी. दोषी विनयला उच्च दर्जाची ट्रीटमेंट दिली जावी.

आपल्या आईलाही ओळखत नाही विनय
त्यांनी सांगितले की, ही घटना रविवारी दुपारी जेल नंबर 3 मध्ये घडली, त्यानंतर जखमी विनयवर जेलमध्ये उपचार करण्यात आले. विनय लोकांना ओळखूही शकत नाही, तो आपल्या आईलाही ओळखू शकला नाही.

निवडणूक आयोगात पोहचले विनयचे वकील
दोषी विनयचे वकील एपी सिंह निवडणूक आयोगात सुद्धा पोहचले आहेत. त्यांनी इलेक्शन कमीशन ऑफ इंडियामध्ये एक पिटिशन दाखल केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, 30 जानेवारीला विनय शर्माची मर्सी पिटिशन दिल्ली सरकारकडे पोहचली होती. परंतु, जेव्हा रिजेक्श्नचे रिकमंडेशन करण्यात आले तेव्हा मनीष सिसोदिया हे आमदार नव्हते आणि दिल्ली सरकारचे गृहमंत्रीसुद्धा नव्हते. दिल्लीत त्यावेळी आचारसंहिता लागू झालेली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या ओएसडीच्या सहीची जी डिजिटल कॉपी लावली आहे ती व्हॉट्सअपची स्क्रीनशॉट आहे. ती दया याचिकेसोबत लावली गेली आणि त्या आधारावर 1 फेब्रुवारीला विनयची दया याचिका फेटाळण्यात आली.