पुण्यातील वकिलाची कार्यालयात गळफास घेवुन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकिल युवराज ननावरे यांनी आज (सोमवार) कार्यालयात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. ननावरे यांच्या आत्महत्येमुळे वकिल वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

युवराज ननावरे हे धनकवडी परिसरात रहावयास होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजु शकलेले नाही. ननावरे हे गेल्या 25 वर्षापासुन शिवाजीनगर येथील न्यायालयात सिव्हील प्रॅक्टीस करीत होते. अत्यंत मनमिळावु स्वभावाचे असलेले ननावरे यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत त्यांच्या जवळच्या मित्रांना देखील माहित नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. ननावरे यांचे कार्यालय धनकवडी परिसरात होते. त्यांचा परिसरात दांडगा जनसंपर्क होता. ज्येष्ठ वकिलांशी देखील त्यांचे चांगले संबंध होते. ननावरे यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. ननावरे यांच्या कुटूंबामध्ये पत्नी, १ मुलगी व १ मुलगा आहे.