काय सांगता ! होय, शेवटची कधी अंघोळ केली हे लेडी गागाला नाही आठवत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – फेमस अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर लेडी गागाला दररोज अंघोळ करायला आडवत नाही. इतकेच नाही तर शेवटची अंघोळ कधी केली होती हेही लेडी गागाला आठवत नाही. खुद्द लेडी गागानं याबाबतीत खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र थंडी आहे. अनेक लोक असे असतात ज्यांना रोज अंघोळ आवडत नाही. फक्त सामान्यच नाही तर सुपरस्टार्सही असे आहेत ज्यांना रोज अंघोळ करायला आवडत नाही. लेडी गागा त्यांच्यापैकीच एक आहे.

View this post on Instagram

💃

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

लेडी गागानं ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे. ट्विटमध्ये तिनं म्हटलं आहे की, तिला दररोज अंघोळ करायला आवडत नाही. सिनेमा किंवा गाण्यामळे नाही तर लेडी गागा अंघोळीच्या मुद्द्यावरून चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

#JustDanceTurns10

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

लेडी गागा काय म्हणाली ?
लेडी गागा आपल्या ट्विटमध्ये म्हणते की, “मला माझ्या एका सहकाऱ्यानं विचारलं होतं की, तू शेवटची अंघोळ कधी केली होतीस तुला आठवतं का? या प्रश्नावर मला आठवत नाही असं उत्तर मी दिलं.” असं ट्विट लेडी गागानं केलं आहे. सध्या लेडी गागाचं हे ट्विट सोशलवर चर्चेत आहे. सध्या हे ट्विट व्हायरल होताना दिसत आहे. हजारो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

लेडी गागाबद्दल बोलायचं झालं तर जगातील सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी ती एक आहे. ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब अशा असे नामांकित पुरस्कारांवर लेडी गागानं आपलं नाव कोरलं आहे.

View this post on Instagram

Happy New Year!🌻

A post shared by Lady Gaga (@ladygaga) on

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/