तुमच्या ‘फिंगरप्रिंट’नं अनलॉक होणार ‘हे’ कुलूप, 6 महिने टिकते बॅटरी, जाणून घ्या इतर ‘फीचर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॉट्रोनिक्सनं (Potronics)नं अलीकडेच Biolock(स्मार्ट बायोमॅट्रीक पॅडलॉक) लाँच केलं आहे. कंपनीकडून लाँच करण्यात आलेलं हे लॉक खूप मजबूत आहे. तुम्ही याचा हवा तसा वापर करू शकता. बॅग, सुटकेस, दरवाजा असं अनेक ठिकाणी हे लॉक वापरलं जाऊ शकतं. आता तुम्हाला पासवर्ड विसरण्याची किंवा चावी हरवण्याची चिंता नाही. बायोलॉकचा वापर करण्यासाठी कोणत्याही ब्लुटूथ किंवा अ‍ॅप्लिकेशनचीही गरज नाही. तुमचं फिंगरप्रिंटच असेल तुमच्या लॉकची चावी.

या लॉकची खास बात अशी आहे की, या लॉकला तुम्ही 40 फिगंरप्रिंट अ‍ॅड करू शकता. हे लॉक ओपन करण्यासाठी केवळ 0.5 सेकंदाचा वेळ लागतो. या बायोलॉकमध्ये एक एलईडी सांकेतिक असतं. हे स्मार्ट लॉक असलं तरीही खूप मजबूत आहे. प्रमुख बाब अशी की, हे लॉक स्टेनलेस स्टील बनलेलं असतं. IP66 रेटेड असल्यानं हे बायोलॉक पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. हे बायोलॉक वजनानं हलकं असून याचं वजन केवळ 59 ग्रॅम एवढं आहे.

बायोलॉकची आणखी एक खासियत म्हणजे हे एक रिचार्जेबल स्मार्ट पॅडलॉक आहे. यात 1000mAh ची इनबिल्ट बॅटरी आहे. अवघ्या 30 मिनिटात हे लॉक पूर्ण चार्ज होतं. याची चार्जिंग तब्बल 6 महिने टिकते. 5V USB अ‍ॅडॅप्टर असल्यानं USB पावर सप्लायनं हे लॉक चार्ज केलं जाऊ शकतं. Potronics Biolock Amazon वरून खरेदी केलं जाऊ शकतं. याची किंमत 1899 रुपये आहे. याची 12 महिने वॉरंटी असते.