Royal Enfield घेऊन येतंय कमी किंमतीची Thunderbird 350 ! जाणून घ्या काय आहेत बदल ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रॉयल एनफील्ड आपल्या ग्राहकांसाठी परवडणारं व्हॅरिएंट आणत आहे. नुकत्याच कंपनीने कमी किमतीची बुलेट 350 आणि क्लासिक 350 एस ही बाईक लाँच केली आहे. या धर्तीवर कंपनी आता थंडरबर्ड 350 चं परवडणारं व्हॅरिएंट आणण्याच्या तयारीत आहे. थंडरबर्ड 350 च्या स्वस्त व्हॅरिएंटमध्येही कमी किंमतीची बुलेट 350 आणि क्लासिक 350 एस सारखे बदल पहायला मिळतील.

दिल्ली ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून समजत आहे की, थंडरबर्ड 350 च्या स्वस्त व्हॅरिएंटऐवजी रिअरमध्ये ड्रम ब्रेक मिळेल. सोबतच यात ड्युअल चॅनल एबीएसऐवजी सिंगल चॅनल एबीएस असेल. असं सांगितलं जात आहे की, बाईकमध्ये नवीन बुलेट 350 आणि क्लासिक 350 एस प्रमाणे कॉस्ट कटींग पहायला मिळणार आहे.

नव्या थंडरबर्ड 350 मध्ये स्पोक व्हील्ज, टर्न इंडिकेटर कव्हर्स आणि हेडलॅम्प कव्हर ब्लॅक कलरमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे. थंडरबर्ड 350 एसमध्ये हे पार्ट्स ब्लॅक कलरमध्ये आहेत. परंतु त्यात अलॉय व्हील्ज, ट्युबलेस टायर आणि ब्राईट पेंटवर्क देण्यात आलं आहे जे परवडणाऱ्या थंडरबर्ड 350 मध्ये नसणार आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा बाईक वेगळी करण्यासाठी यामध्ये नवीन कलर ऑप्शन्स दिले जाऊ शकतात.

ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीला दिलेल्या कागदपत्रांमध्ये बाईकमध्ये एका ऑप्शनल हेडलॅम्प बल्बच्या उपयोगाचाही उल्लेख आहे. त्यामुळे थंडरबर्ड 350 मध्ये सामान्य हॅलोजन हेडलॅम्प मिळण्याची शक्यता आहे. मेकॅनिकली बाईकमध्ये कोणताही बदल नसेल. यातही सध्याच्या मॉडेलमधील 346 cc एअरकुल्ड इंजिन मिळेल. डॉक्युमेंट्समधून हेदेखील स्पष्ट झालं आहे की, स्वस्त व्हेरिएंटचं इंजिन बीएस 4 च असणार आहे.

किंमत
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सध्या थंडरबर्ड 350 ची किंमत 1.57 लाख रुपये आहे. पहिल्यांदा लाँच झालेली स्वस्त बुलेट आणि क्लासिक 350 एसची किंमत त्यांच्या स्टॅंडर्ड मॉडेलच्या तुलनेत 8-9 हजार रुपये कमी आहे. किंमतीत इतकीच घट कमी किंमत असणाऱ्या थंडरबर्ड 350 मध्ये पहायला मिळू शकते. परवडणाऱ्या थंडरबर्डची किंमत जवळपास 1.47 लाख रुपये असू शकते.

Visit : Policenama.com