home page top 1

धक्कादायक ! अफगाणी नागरिकांच्या पोटातून चक्क 370 कॅप्सूल जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच अफगाणी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोटात हेरॉईन या ड्रग्जच्या 370 कॅप्सूल्स सापडल्या आहेत. याची किंमत जवळपास 15 कोटी असून दिल्लीमध्ये हा माल विकण्याची त्यांची योजना होती.

drugs-2_092019085407.jpg

14 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या विशेष पोलिसांनी आणि कस्टम विभागाने भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर पाच अफगाणी नागरिकांना ताब्यात घेतले. माहितीच्या आधारे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं कि, त्यांनी हेरॉईन हे ड्रग्ज असलेल्या कॅप्सूल गिळल्या आहेत. त्यांनतर त्यांना पोलीस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. एक्स-रे काढल्यानंतर डॉक्टरांना देखील धक्का बसला. त्यावेळी पोलिसांनी डॉक्टरांच्या साहाय्याने त्यांच्या पोटातून जवळपास 370 कॅप्सूल जप्त केल्या. ज्याची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या कॅप्सूल दिल्लीमध्ये विक्री केल्या जाणार होत्या. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे आणखी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

visit: Policenama.com

Loading...
You might also like