Afghanistan : अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये बॉम्बस्फोट

अफगाणिस्तान : वृत्तसंस्था  

अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाल्याची खबर एका वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे. हे बॉम्बस्फोट पीडी १३ आणि काला-ए-फतुल्लाह या ठिकाणी झाले आहेत. या स्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा तिथे तातडीने हजर झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दश्त-ए-बार्ची या परिसरात चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे. दरम्यान स्फोटात कोणी मृत आणि जखमी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आले नाही.