दुष्काळात 13 वा ! आता पाकिस्तानला अफगाणिस्तानं ‘फटकारलं’

पोलीसनामा ऑनलाईन – “जम्मू कश्मीर हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा आहे. पाकिस्तान जाणुनबुजून अफगाणिस्तानशी याचा संबंध जोडत आहे. त्यांचा हा हेतू म्हणजे अफगाणिस्तानातील हिंसाचाराला फुंकर घालण्यासारखा आहे. ” या शब्दात अमेरिकेतील अफगाणिस्तानच्या राजदूत रोया रहमानी यांनी प्रतिक्रिया दिल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू कश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान एकटा पडला आहे. त्यात पाकिस्तानने “कश्मीरमधील तणावाचा परिणाम अफगाणिस्तानात सुरु असलेल्या शांततेच्या प्रयत्नांवर परिणाम होऊ शकतो.” असे विधान केले होते. मात्र अफगाणिस्तानातील शांततेबाबत सुरु असणाऱ्या प्रयत्नांना कश्मीरच्या सद्यस्थितीशी जोडणारे विधान हे चुकीचे आणि बेजबाबदार आहे. या शब्दात रहमानी यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. रहमानी म्हणल्या, “अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असद माजिद खान यांनी हे वक्तव्य केले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद यांनी अफगाणिस्तानचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्याशी झालेल्या भेटीत केलेल्या वक्तव्यापेक्षा आता केलेले वक्तव्य अगदी विरुद्ध आहे.”

कश्मीर मुद्द्यावर एका बंद खोलीत झालेली संयुक्त राष्ट्र परिषदेची एक बैठक कोणतेही विधान न होता संपली होती. जागतिक संघटनेच्या १४ देशांची सदस्यता असलेल्या जास्तीत जास्त देशांनी कश्मीर मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा असल्याचे सांगितले. त्यामुळे या मुद्द्याचे आंतरष्ट्रीयीकरण करायला निघालेल्या पाकिस्तान आणि चीन या देशांना चांगलाच झटका बसला आहे.

आरोग्यविषयक वृत्त-