इम्रान खानची नवी ‘राज’नीती, डोनाल्ड ट्रम्प यांना दिली ‘ही’ ऑफर, भारतासाठी धोका ?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी तडफडत आहे. दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या न आवळल्यामुळे, भारतामध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार धरत ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (FATF) एशिया-पॅसिफिक गटाने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मदत मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. अशातच पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेला एक ऑफर दिली असून नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे ऑफर :
अमेरिकेला अफगाणिस्तानात मागील १८ वर्षापासून तैनात असलेले अमेरिकन सैन्य पुन्हा माघारी बोलवून घेणे सध्या गरजेचे आहे. हाच धागा पकडत पाक PM इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आर्थिक निधीसाठी प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार अमेरिका जेवढा खर्च अफगाणिस्तानावर करते, त्याचा निम्मा खर्च पाकिस्तानला दिला तर अफगाणिस्तानात शांतता राखण्याची गॅरंटी पाकिस्तान घेईल असं सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या या प्रस्तावाने अमेरिकाही आनंदी आहे. कारण यामुळे अमेरिकेचे सैन्यही परत येईल आणि त्यांचा अर्धा खर्चाची बचतदेखील होणार आहे.

अफगाणिस्तानातून सैन्य हटवणे USA साठी का अवश्यक :
डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील निवणुकीच्या जाहीरनाम्यात अफगाणिस्तानातील सैन्य हटवण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं. जरी अमेरिकेतील पुढील निवडणुकांना वेळ असला तरी आश्वासनपूर्ती अमेरिकन नागरिकांना खुश करेल. मात्र ट्रम्प यांनी तसं केल्यास तर पुन्हा एकदा अफगाणिस्तानात दहशतवादी कारवायांना ऊत येईल. कतारमध्ये तालिबानसोबत अमेरिकेची या विषयी चर्चा सुरू आहे. त्यामुळे अमेरिका कोणत्या अटीवर त्यांचे सैन्य मागे घेणार आणि अफगाणिस्तान-तालिबान यांच्यासोबत काय संबंध असतील हे काही काळाने ठरेल. सध्या कालच्या संबोधनात डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेचे ८६०० सैनिक तालिबानात राहून त्यांच्यावर देखरेख ठेवणार आहे. जर पुन्हा तालिबानमध्ये हिंसा वाढली तर अमेरिका तालिबानात इतके सैन्य पाठवील ज्याची कल्पनाही करता येणार नाही.

भारतासाठी का आहे धोका :
अफगाणिस्तानात भारताचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतो. तालिबानमधील एका मोठा गट आहे जो पाकिस्तानचं समर्थन करतो. त्यांच्या मदतीने काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी पाकिस्तानला मदत होईल. अमेरिकेकडून मिळालेल्या पैशाचा वापरदेखील पाकिस्तान भारताविरोधात कारवायांसाठी करेल.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like