या आफ्रिकन देशात आहेत मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त ; ५० वर्षांपासून साजरा होतो गणेशोत्सव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गणेशोत्सव महाराष्ट्रासहीत संपूर्ण देशात खूप लोकप्रिय आहे. आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतापासून हजारो मैलांच्या अंतरावर असलेल्या आफ्रिकेच्या घानामध्ये भगवान गणेशाचा जयजयकार केला जात आहेत. येथे गणपतीच्या मूर्तीची पूजा त्याच भक्तिभावाने, मोठ्या थाटात आणि समान उत्साहाने केली जाते.
इस अफ्रीकी देश में बसे श्रीगणेश के भक्त, 50 साल से लग रहे गणपति के जयकारे

आफ्रिकन देश घाना येथे आफ्रिकन हिंदू गणपती बाप्पांची पूजा करतात. येथे दरवर्षी धुमधडाक्यात आणि वाजत गाजत गणेशाची पूजा केली जाते आणि भारतीय हिंदूप्रमाणेच ते गणेशमूर्तीचे विसर्जनही करतात. बीबीसीच्या वृत्तानुसार, सन १९७० मध्ये इथल्या लोकांची ओळख हिंदुत्वाशी झाली. आज या आफ्रिकी देशात सुमारे १२ हजार हिंदू राहत आहेत.
इस अफ्रीकी देश में बसे श्रीगणेश के भक्त, 50 साल से लग रहे गणपति के जयकारे
आरती दरम्यान घानामधील हे लोक माथा टेकवणे, शंख वाजवणे, फळ किंवा मोदक अर्पण करणे, आरती करणे किंवा भजन कीर्तन करणे अशी सर्व कृत्ये विधिवत करतात. घानामध्ये राहणार्‍या हिंदू समुदायाचे लोक असे म्हणतात की ते तीन दिवस विधिवत भगवान गणेशाची पूजा करतात आणि मग त्यांची मूर्ती समुद्रात विसर्जित करतात.

केवळ भगवानच गणेशच नाही तर श्रीकृष्ण आणि शिवभक्तांचीही घानात कमतरता नाही. येथे हिंदू धर्माच्या इतर अनेक देवतांची पूजा देखील केली जाते. इथले लोक म्हणतात की समुद्र सर्वत्र आहे आणि कदाचित म्हणूनच गणेशाचा आशीर्वाद सर्वत्र पसरला आहे. प्रत्येकाने देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण ते आपल्याला सर्व अडचणींमधून बाहेर काढू शकतात.