दहा दिवसांच्या बाप्पांना आज निरोप, विसर्जन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आज अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी पोलिस व पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजावर नियंत्रण ठेवण्याचा पवित्रा एकीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत निघणाऱ्या मिरवणुकांचे नेटके नियोजन करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9f61e63-bee1-11e8-a756-21df146e4cb6′]

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश मंडळांनी मिरवणुकींमध्ये डीजे लावू नयेत, अशा सूचना पोलिसांनी सर्व मंडळांना देण्यात आले आहेत. डीजे लावल्यानंतर तो जप्त करण्याचे आदेश स्थानिक पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावर होणारी गर्दी पाहता या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B07FCMHLQY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f56c141a-bee1-11e8-b5aa-3db08e3f5aed’]

मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गावरून साधारण सहाशे मंडळे जातात. मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावू नयेत म्हणून मंडळे व डीजे व्यवसायिकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तसेच, डीजे लावल्यास ते स्थानिक पोलिसांनीच जप्त करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, त्या मंडळांवर कोर्टाच्या आदेशानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अनेक मंडळांनी डीजे न लावता सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत पार पाडवी म्हणून पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनी देखील कोणत्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये.

पुणे : श्रीमंत दगडु शेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक निघणार ‘विश्व विनायक’ रथातून

संशयास्पद वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ १०० क्रमांकावर किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन विशेष शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. बंदोबस्तामध्ये अनेक तास पोलिसांना रस्त्यावर उभे राहवे लागते. गणवेशासोबतच्या शूजमुळे अनेक पोलिसांचे पाय सुजतात. त्यामुळे या वर्षी पोलिसांना बंदोबस्तामध्ये स्पोर्ट शूज घालण्याची परवानगी पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

मुंबईतील सार्वजनिक गणशोत्सव मंडळांतील बाप्पांसह घरगुती गणपतींचेही विसर्जन होणार असल्याने गिरगाव, दादर, जुहू या चौपाट्यांसह अन्य सुमारे १०० विसर्जनस्थळी पालिकेचे हजारो कर्मचारी दिवसरात्र नियोजनासाठी तैनात असतील. यासाठी २४१७ अधिकाऱ्यांसह ६,१८७ पालिका कामगार कर्तव्यावर असणार आहेत