डिलिव्हरीच्या 10 दिवसांनंतर विराट कोहलीसोबत दिसली अनुष्का शर्मा, पाहा फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 11 जानेवारी रोजी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः ही बातमी शेअर केली. त्यांनतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. दरम्यान, प्रसूतीच्या 10 दिवसानंतर अनुष्का आणि विराट आज वांद्रेमध्ये दिसले. विराट आणि अनुष्का वांद्रे येथील क्लिनिकमध्ये गेले होते. जिथे मीडियाने अनुष्का आणि विराटच्या संमतीने दोघांचे फोटो क्लिक केले. त्याचवेळी अनुष्काने मीडियाच्या कर्मचार्‍यांचे गोपनीयतेची काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

फोटोमध्ये पहिले जाऊ शकते कि, दोघांनीही कोरोना साथीला ध्यानात घेऊन मास्क घातले आहेत. परंतु ते आनंदी दिसत आहे. यावेळी विराटने ब्लॅक कलरचा आउटफिट परिधान केला आहे, त्याच अनुष्काने डेनिम लुक कॅरी केला आहे. अनुष्का आणि विराटने एकमेकांचा हात धरला आहे. महत्वाचे म्हणजे प्रसूतीनंतरही अनुष्का तितकी फिट दिसत होती, जशी ती तिच्या गरोदरपणापूर्वी होती. त्यांचे हे फोटोज इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. चाहते लाईक्स आणि कमेंट्सद्वारे आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

दरम्यान, 11 जानेवारीला विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने आपण वडील झाल्याची बातमी देताना त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेण्यास सांगितले होते. वडील झाल्यापासून विराट खूप आनंदी दिसत आहे, याचा अंदाज त्याच्या ट्विटर बायोवरून घेऊ शकतो. बायो अपडेट करत त्याने लिहिले, “अभिमानी नवरा आणि वडील”. आतापर्यंत त्याने आपल्या मुलीची एक झलकदेखील शेअर केलेली नाही.

गरोदरपणातही अनुष्का आपल्या कामाबद्दल खूपच गंभीर होती. एका टीव्ही जाहिरातीसाठी ती अनेकवेळा सेटवर शूटिंग करतानाही दिसली. तिने प्रेग्नन्सी दरम्यान इन्स्टाग्रामवर काही फोटोही शेअर केले होते. अनुष्का आणि विराटने अनुष्काच्या गरोदरपणाविषयी ऑगस्ट महिन्यात सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली होती. जिथे दोघे एकमेकांसमवेत उभे दिसतात. ही चांगली बातमी ऐकून सर्व चाहते आणि सेलेब्स उत्साही दिसले.