Photos : डिलीव्हरीच्या 10 दिवसांनंतर पती विराट कोहलीसोबत बाहेर दिसली अनुष्का शर्मा !

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती व टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) नुकतेच आईबाबा झाले आहेत. अनुष्कानं 11 जानेवारी 2021 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आई झाल्यानंतर आता 10 दिवसानंतर अनुष्का आणि विराट बांद्र्यामध्ये स्पॉट झाले.

विराट आणि अनुष्का बांद्र्याच्या क्लिनिकमध्ये गेले होते. इथं आल्यानंतर दोघांच्या सहमतीनं मीडियानं अनुष्का आणि विराट यांचे फोटो क्लिक केले. इतकंच नाही तर अनुष्कानं मीडियातील लोकांना त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेतल्याबद्दल धन्यवादही दिले.

फोटोत दिसत आहे की, त्यांनी सुरक्षेची काळजी घेत मास्क परिधान केलं आहे. दोघं खूपच आनंदी दिसत आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर विराटनं ब्लॅक कलरचा आऊटफिट घातला आहे तर अनुष्कानं पूर्णपणे डेनिम लुक कॅरी केला आहे.

विराट आणि अनुष्काचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी फोटो सोशलवर शेअर केले आहेत.

अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं प्रोड्युस केलेली पाताल लोक ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाली आहे. या सीरिजचं खूप कौतुक झालं आहे. याशिवाय तिनं प्रोड्युस केलेला बुलबुल हा सिनेमाही नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे ज्याला चाहत्यांचं भरपूर प्रेम मिळालं. अॅक्टींगबद्दल बोलायचं झालं तर अनुष्का दीर्घकाळापासून सिनेमांपासून दूर आहे. तिचा परी हा सिनेमा रिलीज होऊन 2 वर्षे झाली आहे. ती सुई धागा या सिनेमात वरुण धवनसोबत दिसली होती. या सिनेमातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं.