सप्टेंबर 2009 मध्ये जारी झालं होतं पहिलं ‘आधार’कार्ड, 10 वर्षानंतर 125 कोटींवर पोहचली संख्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंथा – देशभरात आधार कार्डची संख्या 125 कोटींच्या पार पोहचली आहे. आधार कार्डला सुरुवात करणारी संस्था यूनिक आईडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआईडीएआई) ने शुक्रवारी घोषणा करताना सांगितले की, 10 वर्ष तीन महिने इतका कालावधी या कामासाठी लागला आहे.

12 आकड्यांची विशिष्ठ ओळख
आधार कार्ड हे भारत सरकारने भारतीय नागरिकांना दिलेली ओळखपत्र आहे. नंदन निलेकणी यांना प्रथम युआयडीएआयचे अध्यक्ष केले गेले. त्यामध्ये एक 12-अंकी क्रमांक छापलेला आहे. ही संख्या भारतातील कोठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा असेल. भारतीय टपाल विभाग आणि यूआयडीएआय द्वारा प्राप्त दोघांच्या वेबसाइटवरून डाउनलोड केलेला ई-आधार देखील वैध समजले जाते.

जगातील सर्वात मोठा बॉयोमेट्रिक आईडी
आधाराला जगभरातील सर्वात मोठी बॉयोमेट्रिक आईडी प्रणाली मानले जाते. जागतिक बँकेचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनी “जगातील सर्वात अत्याधुनिक आयडी प्रोग्राम” म्हणून आधारचे वर्णन केले. युआयडीएआयच्या दोन डेटा सेंटरमध्ये आधारचा डेटाबेस ठेवण्यात आला आहे. या दोन केंद्रांवर एकूण सात हजाराहून अधिक सर्व्हर आहेत. ही डेटाबेस केंद्रे औद्योगिक मॉडेल टाउनशिप (आयएमटी), मानेसर आणि बेंगलोर येथे आहेत.

या ठिकाणी होता आधारच उपयोग
सुरुवातीला आधारचा उपयोग बँक खाते उघडण्यासाठी आणि सिम कार्ड खरेदीसाठी केला जात होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता इकेवायसीनुसार यामध्ये प्रयोग केला जाऊ शकत नाही. अनेक बाकीच्या सेवांसाठी याचा प्रयोग अजूनही सुरु आहे.

  • पासपोर्ट मिळवण्यासाठी आधार अनिवार्य करण्यात आले आहे.
  • जनधन खाते खोलण्यासाठी आधारच उपयोग होतो.
  • एलपीजी गॅसच्या सबशिडीसाठी आधारचा उपयोग होतो.
  • ट्रेन तिकिटांमध्ये सूट मिळवण्यासाठी
  • डिजिटल जीवन प्रमाणपत्र (लाइफ सर्टिफिकेट) साठी आधार जरुरी आहे.
  • पीएफ (PF ) च्या प्राप्तीसाठी आधार असणे गरजेचे आहे.
  • डिजिटल लॉकरसाठी आधार जरुरी
  • संपत्ती रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे.
  • विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती देखील आधार कार्डनुसार त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
  • आयकर भरण्यासाठी आधार गरजेचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/