115 दिवसांनंतर सुरू झाली ‘तारक मेहता’ची शुटींग, डायरेक्टरनं शेअर केले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तारक मेहता का उल्ट चश्मा मालिकेच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. या शोची शुटींग आता सुरू झाली आहे. शोचे चीफ डायरेक्टर मालव राजदानं सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

मालवनं लिहिलं, “ROLL…ROLLING…115 दिवसांनंतर शुटींग फायनली सुरू झाली आहे. काम सुरू करून खूप चांगलं वाटत आहे. पुन्हा हसण्यासाठी तयार रहा.”

मालवच्या या पोस्टवर त्याची पत्नी प्रिया हिनं कमेंट करत लिहिलं की, “लव यु मालव. तुझ्यासाठी खूप खुश आहे. प्लिज स्वत:ची काळीज घे आणि सुरक्षित रहा. आतापासूनच तुला मिस करत आहे.” अनेकांना माहितीच असेल की, प्रिया शोमध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारते. शोमध्ये तिला खूप कमी पाहिलं जातं.

शोची शुटींग करण्याआधी मॉक शुट करण्यात आलं. मालवनं मॉक शुटचे काही फोटो सोशलवर शेअर केले होते.

शोबद्दल बोलायचं झालं तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला चाहत्यांचं खूप प्रेम मिळत आहे. हा शो 11 वर्षांहून अधिक काळापासून लोकांना हसवण्याचं काम करत आहे.

View this post on Instagram

🥰🥰🥰 FAMILY 🥰🥰🥰 Missing u guys

A post shared by Malav Rajda (@malavrajda) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like