चौदा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चव्हाणवस्तीत सुसज्ज अंगणवाडी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – गेली चौदा वर्षे चव्हाणवस्तीत अंगणवाडीसाठी जागा नव्हती. एका अपुऱ्या खोलीत अंगणवाडी चालवली जात असे. मात्र येथील स्थानिक प्रकाश रोहिदास चव्हाण यांनी स्वतःसाठी बांधलेले घर अल्प मोबदल्यात अंगणवाडीसाठी उपलब्ध करुन दिले. आज येथे सुसज्ज व लहान मुलांसाठी सोयीस्कर इमारत तयार झाली आहे.

थेऊर येथील लोकसंख्येत वैविध्यपूर्ण समाज रचना आहे. प्रत्येक समाजातील नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबध्द आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी या मुलभुत सुविधा नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरविल्या जातात. आरोग्याच्या प्रत्येक सुविधा उपलब्ध करुन देताना अंगणवाडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांना सकस आहार पुरविण्यात येतो. येथील चव्हाणवस्ती येथे गेली चौदा वर्षे ही अंगणवाडी एका अपुऱ्या जागेत चालविली जात होती. कारण येथे सोयीस्कर अशी जागा उपलब्ध होत नव्हती. परंतु येथील स्थानिक प्रकाश रोहिदास चव्हाण यांनी स्वतःसाठी बांधलेले घर ग्रामपंचायतीस अंगणवाडीसाठी अल्प दरात उपलब्ध करून दिले. यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून निधी मंजूर करुन ही इमारत खरेदी केली. यामुळे अंगणवाडी सेविका आरती कोढेकर यांचे अनेक वर्षाचे स्वप्न वास्तवात उतरल्यावर त्यांना मोठा आनंद झाला.

या नविन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन गावचे उपसरपंच विलास कुंजीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, माजी उपसरपंच भाऊसाहेब काळे, शहाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य नितीन कुंजीर तसेच यशवंत कुंजीर, रोहिदास चव्हाण, भाऊसिंग चव्हाण, कोंडीबा चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Visit : policenama.com