21 वर्षानंतर अखेर इंजमाम उल हकने मान्य केले – ‘त्या मॅचमध्ये नॉट आऊट होता सौरव गांगुली’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकने 21 वर्षानंतर मान्य केले आहे की, 1999 च्या चेन्नई टेस्टमध्ये सौरव गांगुलीचा कॅच संशयाच्या भोवर्‍यात होता. भारतीय स्पिनर आर अश्विनशी बोलताना त्याने या गोष्टीची कबुली दिली. 1999 च्या चेन्नई टेस्टच्या दुसर्‍या डावात सकलैन मुश्ताकच्या चेंडूवर गांगुलीला विकेटकीपर मोईन खानच्या हातून कॅच आऊट ठरवण्यात आले होते. या टेस्ट मॅचचा कर्णधार वसीम अकरम होता, ती पाकिस्तानने 12 धावांनी जिंकली होती.

अश्विनने विचारले- आऊट होता किंवा नाही
अश्विनचा यूट्यूब शो डीआरएस विथ अ‍ॅशमध्ये इंजमामने सांगितले की, ती सीरीज आठवली तरी आजही आनंद होतो. चेन्नई टेस्टबाबत आश्विनने म्हटले, तेव्हा मी लहान होतो आणि चेपॉकमध्ये आपली पहिली लाइव्ह टेस्ट पाहिली होती. सौरव गांगुलीने एक शॉट लगावला आणि चेंडू सिली पॉईंटवर गेला, जेथे बहुतेक मोईन अलीने कॅच पकडाला होता. आजपर्यंत आम्हाला माहित नव्हते की, तो आऊट होता किंवा नाही, कारण त्यावेळी कॅमेरे इतके चांगले नव्हते.

इंजमामने मान्य केले – डाऊटफुल होता कॅच
यावर इंजमाम म्हणाला, तो भारतात आपली पहिली टेस्ट मॅच खेळत होता. त्याने म्हटले त्या प्रकरणात दोन लोक सहभागी होते. एक अजहर महमूद आणि दूसरा मोईन खान. जेव्हा सौरवने शॉट खेळला तेव्हा तो प्रथम अजहर महमूदच्या शरीरावर लागला आणि नंतर मोईन अलीने तो पकडला. मी याबाबत स्पष्ट सांगू शकत नाही कारण अजहर ती टेस्ट खेळत नव्हता. मी दुसर्‍या डावात आजारी होतो, तेव्हा माझ्या जागी अजहर माझ्या ठिकाणी फील्डिंग करत होता. मी त्यावेळी मैदानात नव्हतो, परंतु मी हे सांगू शकतो की, कॅच डाऊटफुल होता.

इंजमामने सांगितले, भारतात खूप प्रेम मिळाले
पाकिस्तानचा कर्णधार असलेला इंजमामने त्यावेळच्या टेस्टच्या वातावरणाची सुद्धा आठवण काढली. तो म्हणाला, त्या मॅचची एक गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. खेळताना पाकिस्तानी टीमला आपल्या घरी खेळत असल्यासारखे वाटले. मॅच जिंकल्यानंतर टीमने मैदानाची चक्कर मारली. गर्दीने तेव्हा आमचे अशाप्रकारे स्वागत केले जसे की भारतानेच मॅच जिंकली आहे.