नववर्षात व्हॉट्सअ‍ॅप देणार जबरदस्त धक्का …!’या’ मोबाईलवरील सेवा होणार बंद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅपने आपलया ग्राहकांकरिता नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता नव्या वर्षासाठी व्हॉट्सअ‍ॅप एक गुड न्युज आणि एक बॅड न्युज आहे. गुड न्युज अशी की, व्हॉट्सअ‍ॅपनने  एक नविन  फीचर आणण्याचे ठरवले आहे. ३१ डिसेंबर नंतर   व्हॉट्सअ‍ॅप काही जुन्या ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणं बंद करणार आहे, त्यामुळे त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.
या मोबईल मधून व्हॉट्सअ‍ॅप होणार अदृश्य 
आजकाल  मोबईल जगतात इतक्या नवनवीन गोष्टी येत आहेत आणि त्याबरोबरच जुन्या गोष्टी आऊटडेटेड होत आहेत. त्याप्रमाणे काही जुण्या फोन मधील ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये  व्हॉट्सअ‍ॅपचालू शकणार नाही.
 Nokia S40, या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या फोनमध्ये ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअ‍ॅप  चालणार नाही. Android २.३.७ आणि जुन्या व्हर्जनसोबत iPhone iOS7 वर १ फेब्रुवारी २०१० नंतर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपनं यासंबंधी माहिती दिली आहे. काही फीचर्स कोणत्याही क्षणी बंद होतील, असंही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी व्हॉट्सअ‍ॅप पनं घेतलेल्या निर्णयानंतर Windows Phone 8.0, ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी १० या मोबाइलमधील WhatsApp ३१ डिसेंबर २०१७ नंतर बंद झाले होते.
WhatsApp :  प्रायव्हसीची चिंता वाटते ? ‘या’ सेटिंग्स बदला अन निश्चिंत रहा
सध्या संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम म्हणून व्हाॅट्सअ‍ॅप कडे पाहिलं जातं. कोणत्याही प्रकारचे डाॅक्युमेंट्स तु्म्ही आता व्हाॅट्स अ‍ॅप च्या माध्यमातून अगदी सहज पाठवू शकता. त्यात मग मेसेज, फोटो, व्हिडीओ असा कोणताही प्रकरा का असेना. परंतु अनेकजण असे आहेत जे सोशल मीडियावर सक्रिय असताना त्यांना आपल्या प्रायव्हसीची विशेष काळजी असते. कारण व्हाॅट्स अ‍ॅप वर त्यांचा पर्सनल फोटोही असतो. कोणीही तो सहज डाऊनलोड करू शकतो. पंरतु आता अशांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण WhatsApp मधील काही सेटिंग्स बदलून आपल्या पर्सनल गोष्टी सेफ ठेवणे शक्य आहे. या नवीन सेटींग्सबाबत आता आपण माहीती घेणार आहोत.
लास्ट सीन-  WhatsApp वर आपण दुसऱ्या व्यक्तीचा लास्ट सीन पाहू शकतो. तसेच आपलाही लास्ट सीन इतरांना दिसतो. त्यामुळे तुम्ही कधीपर्यंत WhatsApp वर अ‍ॅक्टीव्ह आहात याची माहिती इतरांना मिळते. त्यामुळे सेटींगमध्ये जाऊन तुम्ही काही बदल करू शकता. सेटींगमध्ये Everybody च्या जागी Nobody करा म्हणजे तुमचा लास्ट सीन इतरांना दिसणार नाही.
प्रोफाईल फोटो- पूर्वी तुम्ही WhatsApp वर असलेला प्रोफाईल फोटो अगदी सहज सेव्हा करू शकत होतात. परंतु आता जर तुम्हाला तुमचा फोटो कोणी शेअर किंवा डाऊनलोड करू नये असं जर वाटत असेल  तर फोटोची व्हिजिबिलीटी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतच मर्यादीत ठेवा.
मेसेज प्रिव्ह्यू- WhatsApp वर येणाऱ्या सर्व मेसेजचा सर्वात आधी एक स्मॉल प्रिव्ह्यू दिसतो. मात्र तुम्हाला तो प्रिव्ह्यू नको असेल तर नोटीफिकेशन सेटिंग्समध्ये जाऊन Show Preview हा पर्याय बंद करा म्हणजे मेसेज प्रिव्ह्यू दिसणार नाही.
WhatsApp  स्टेटस- एखादा व्हिडीओ, फोटो किंवा काही टेक्स्ट मेसेज WhatsApp  स्टेटसवर ठेवले जातात. 24 तास हे स्टेटस दिसत राहतं. मात्र तुम्हाला ते स्टेटस काही मोजक्याच मंडळींना दाखवायचं असल्यास तुम्ही स्टेट्स प्रायव्हसीमध्ये जाऊन Only Share With या पर्यायावर क्लिक करा.
रीड रिसीट- एखाद्या व्यक्तीने पाठवलेला मेसेज आपण पाहिला की नाही हे समोरच्या व्यक्तीला प्रामुख्याने ब्ल्यू टीक पाहिल्यानंतर कळतं. मात्र तुम्ही मेसेज वाचला हे कळू नये असं वाटत असेल तर रीड रिसीट टर्न ऑफ करा. असे केल्यास समोरच्या व्यक्तीला मेसेजला ब्ल्यू टीक दिसणार नाही.
अशा प्रकारे तुम्ही जर एकदाच या सेटींग्स करून ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या प्रायव्हसीची चिंता करण्याची अजिबात गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या खासगी फोटो किंवाव्हिडिओची सहज काळजी घेऊ शकता.