मोदी सरकारकडून मुस्लिमांसाठी योजनांचा ‘पाऊस’ ; ‘PMJVK’मध्ये अल्पसंख्यांकांसाठी विशेष ‘तरतूद’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बऱ्याचदा मोदी सरकारच्या मुस्लिमांबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल चर्चा होत असते. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा देखील विरोधी पक्षांकडून वारंवार उपस्थित केला जातो. मात्र मोदी सरकार सातत्याने अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांसाठी चांगले निर्णय घेताना दिसत आहे.

आपल्या दुसऱ्या टर्म मध्ये सरकार बनताच पंतप्रधानांनी मुस्लिम समुदायातील विद्यार्थ्यांसाठी ५ कोटींच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर आता मोदी सरकारने प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (पीएमजेवीके) अंतर्गत योजनांचा पाऊसच अल्पसंख्यांकांवर पडला आहे. हा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी अल्पसंख्यांक मंत्रालय या योजनांवर बारकाईने लक्ष देत आहे.

या योजना केंद्र सरकारद्वारे निश्चित केलेल्या देशभरातील अल्पसंख्यांक बहुल प्रदेशांमधील नागरिकांसाठी असतील. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर विचारात घेऊन या प्रदेशांची निवड केली असून देशभरात असे १३०० प्रदेश केंद्राकडून निवडले गेलेले आहेत.

काय आहेत योजना :

मौलाना आझाद एजुकेशनल फाउंडेशन चे व्हाईस प्रेसीडेंट अशफाक सैफी यांनी सांगितले की, “पीएमजेवीके अंतर्गत या योजनांची अमलबजावणी केंद्र आणि राज्य सरकार मिळून करते. या योजनेंतर्गत अल्पसंख्यांकांना एकाच वेळी अनेक प्रकारचे लाभ दिले जातात. हे लाभ शिक्षण, निवारा, आरोग्य, औषधे इत्यादी प्रकारचे असून मूलभूत गरजांवर प्रामुख्याने काम केले जाते.”

अशफाक सैफी यांनी या योजने संदर्भात माहिती देताना सांगितले की, ” शिक्षण क्षेत्रात ५ पॉलिटेक्निक, ७१ आयटीआय , ५०६ हॉस्टेल , २०,२२८ एक्सट्रा क्लास रूम, २५ डिग्री कॉलेज आणि ११५२ स्कूल बिल्डिंग या सुविधा पुरवण्यांवर भर राहील. तसेच आरोग्यासंबंधी ८२१ छोट्या योजना, ५०९० अंगणवाडी केंद्र देखील अप्लसंख्यांक बहुल क्षेत्रात उघडले जातील. त्याचबरोबर केंद्राने निवडलेल्या या १३०० विशेष क्षेत्रांमध्ये ११,६७६ पक्की घरेदेखील बांधून दिले जाणार आहेत. शेतकरी आणि कलाकारांसाठी ५३०मार्केट शेड देखील बनवले जाणार आहेत.” हे लाभ अल्पसंख्यांक गरजूंपर्यंत नीट पोहोचावेत यासाठी अल्पसंख्यांक मंत्रालय या योजनांच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष देणार आहे.

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

मदरशातील मुलींवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक