5 महिने ‘दिवस-रात्र’ एकत्र राहून केली ‘मज्जा’, प्रेयसी प्रेग्नंट असल्याचे समजताच प्रियकरानं ‘मार्ग’ बदलला

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – एका तरुणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर तब्बल 5 महिने हे जोडपे एकत्र राहिले अन् ती गरोदर राहताच प्रियकराने धूम ठोकल्याची घटना मारेगाव (जि.यवतमाळ) शहरात घडली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून प्रियकराविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

संतोष दत्तू चौघुले (वय 27, रा. मारेगाव, जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने शहरातीलच एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवित डिसेंबर महिन्यात पळवून नेले होते. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. परंतु आरोपी व मुलीचा शोध पोलीसांना लागला नाही. दरम्यान हे जोडपे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मोलमजुरी करून 5 महिने एकत्र राहिले होते. परंतु पाच महिन्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागल्याने पीडित मुलगी आईकडे मारेगावला परतली. पीडितेने प्रियकराच्या विरोधात पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे आढळून आले. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.