अच्छे दिन ! सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात ‘कपात’, पेट्रोल 6 तर डिझेल 9 पैशांनी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सलग चौथ्या दिवशी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज (रविवार) पेट्रोलचे दर ६ पैशांनी तर डिझेलचे दर ९ पैशांनी कमी केले आहेत. शुक्रवारी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये १९ पैशांची कपात करण्यात आली होती. मागील चार दिवसांपासून दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर ५० पैसे आणि डिझेलचे दर ५५ पैशांनी कमी झाले आहेत.

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर –

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत ६९ रुपये ९३ पैसे प्रतिलीटर, मुंबईत ७५ रुपये ६३ पैसे, कोलकत्ता ७२ रुपये १९ पैसे तर चेन्नईत ७२ रुपये ६४ पैसे प्रतीलीटर पेट्रोलचे दर आहेत. तर डिझेलचे दर अनुक्रमे ६३.८४, ६६.९३, ६५.७६ आणि ६७.५२ प्रतीलीटर आहे.

पाच महिन्यानंतर दिल्लीत पेट्रोलचे ७० रुपयांच्या खाली –

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्याने मागील पाच महिन्यापासून वाढलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर ७० रुपयांच्या खाली आले आहेत. दिल्लीत पेट्रोल ६९ रुपये ९३ पैसे प्रतीलीटर तर डिझेल ६३ रुपये ८४ पैसे प्रतीलीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने भारतात पेट्रोल – डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात येत आहे.