तब्बल ५ वर्षानंतर हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई उद्या जामिनावर जेल बाहेर !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अभियंता मोहसिन शेख खून प्रकरणात अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याचा मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. धनंजय देसाई सध्या टाकले कारागृहात असून उद्या सकाळी साडेअकरापर्यंत त्याची सुटाक होईल असे अॅड. मिलींद पवार यांनी सांगितले.

हडपसर येथे उसळलेल्या दंगलीत अभियंता मोहसिन शेख याचा खून झाल्यानंतर पोलिस तपासानंतर मोहसिन शेख खून प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई (वय ३४, रा. हिंदूगड, मुळशी ) आणि इतर २० आरोपींना अटक करण्यात आली. सदर आरोपी हे २०१४ पासून अटकेत आहेत.

मुंबई उच्चन्यायालयात अॅड. अभिजीत देसाई व अॅड. मिलींद पवार यांनी आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करुन युक्तीवाद करण्यात आला. यावेळी आरोपीच्या वतीने जामीन अर्जातून उच्च न्यायालयात सांगितले की, शिवाजी महाराजांची फेसबुकवर बदनामी झाली व ऊत्सफुर्तपणे हिंदु युवकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. कोणाच्या खुनाचा कट केला नव्हता किंवा कोणाच्याही खुनाचा ऊद्देश नव्हता, फक्त आंदोलन सुरू असताना दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली व अचानक मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू झाली व त्यामधे दगड लागुन मोहसिन शेखचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा युक्तीवाद करण्यात आला.

तर सरकार पक्षाचे म्हणणे होते की, या आरोपींनी जातीय दंगल घडवून मोहसिन शेख याचा खून केला आहे, बेकायदा जमाव जमवुन मालमत्तेचे नुकसान केले आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रचार केला व पत्रके वाटली, मुस्लिम समाजाचा बदला घेण्यासाठी चिथावणी दिल्या, मुस्लिम समाजाच्या व्यक्ततीचा खुन केला. मुस्लिम समाजाच्या लोकांच्या दुकानाची तोडफोड केली व हिंदू राष्ट्र सेनेची दहशत रहावी म्हणून आरोपींनी कटकारस्थान केले व म्हणून न्यायालयाने खटल्यातील आरोपीवर भादवि 143 147 148 149 307 302 120 (ब)असा गंभीर गुन्हा केला आहे म्हणून त्यांला जामीन मंजूर करु नये असा युक्तीवाद केला.

न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलका देऊन जामीन मंजूर केला. आरोपी देसाई ने खटला संपेपर्यंत हिंदू राष्ट्र सेनेचे काम करू नये, खटल्याशी संमधीत साक्षी पुराव्याशी छेडछाड करू नये, खटल्याशी संबंधीत साक्षीदारांवर दबाव आणू नये, सुनावणी होई पर्यंत जाहीर भाषणे करू नयेत, असे प्रतिज्ञापत्र देसाईने उच्च न्यायालयात दाखल करावे असे आदेश देत जामीन मंजूर केला आहे.

पुणे जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश ए. एस. भैसारे यांच्या समोर खटल्याची सुनावणी सुरू आहे. अॅड. पवार यांनी देसाईच्या प्रतिज्ञापत्रावर सही घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र कारागृहात दाखल केले आहे. त्यावर सही झाल्यानंतर ते उच्च न्यायालयात दाखल करण्यात येईल व त्यानंतर धनंजय देसाईला कारागृहातून मुक्त करता येईल असे अॅड. मिलींद पवार यांनी सांगितले.
धनंजय देसाईंच्या वतीने अॅड. मिलींद पवार, अॅड. भालचंद्र पवार, अॅड. विश्वास खराबे, अॅड. अजय ताकवणे खटल्याचे कामकाज पहात आहेत.

Loading...
You might also like