तब्बल 80 वर्षांनंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींना प्रवेश, पहिलाच तास महापौरांनी घेतला.

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

राज्यातील सर्व शाळांना आजपासून सुरुवात झाली असून शाळेचा पहिला दिवस असल्याने आपल्या पाल्यला घेऊन जाताना पालक जाताना दिसत आहे.यात पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील दरवर्षी प्रमाणे यंदा देखील शाळेचा पहिला दिवस होता.मात्र यंदा या शाळेत तब्बल 80 वर्षानंतर मुलींना प्रवेश देण्यात आला आहे.या मुलींच्या पहिल्या दिवसाचे स्वागत महापौर मुक्ता टिळक यांनी केले.तर त्यांच्या वर्गाचा तास घेऊन त्या विद्यार्थ्यांनी शी संवाद देखील त्यांनी साधला.

यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की,न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली असून या शाळेतील अनेक विद्यार्थीनी देश पातळीवर नाव केले आहे.तसेच सुरुवातीच्या काही वर्षे मुलींना प्रवेश देण्यात आला.आता पुन्हा प्रवेश देण्यास सुरुवात केल्याची चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

डेक्कन एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष शरद कुंटे म्हणाले की,संस्थेने तब्बल 80 वर्षांनंतर मुलींना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.इतर शाळामध्ये मुले आणि मुली एकत्र शिक्षण घेत आहे. हे लक्षात घेऊन आम्ही मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढील काळात देखील कायम प्रवेश देणे चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तब्बल १३८ वर्षांनंतर पुण्यातील ‘त्या’ शाळेत मुलींना प्रवेश