लग्नाच्या 1.5 महिन्यानंतर Dia Mirza ने कर्न्फम केली प्रेग्नन्सी, बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केले फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   अभिनेत्री दीया मिर्झाने व्हॅलेंटाईन डेच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत लग्न केले. दरम्यान लग्नाच्या दिड महिन्यातच दियाने गुड न्यूज दिली आहे. ती लवकरच आई बनणार आहे. आपल्या प्रेग्नन्सीची स्वत: पुष्टी करत तिने बेबी बंपबरोबर एक फोटो शेअर केला आहे, या बातमीनंतर आता बॉलिवूड सेलेब्स आणि तिचे चाहते दीया मिर्झाचे अभिनंदन करत आहे. दीया मिर्झाने इंस्टाग्रामवर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे, त्यासह तिने एक कॅप्शन देखील दिले आहे.

 

दरम्यान, लग्नाच्या दीड महिन्यांपूर्वी दियाने आपल्या आणि वैभवाच्या नात्याबद्दल सांगितले होते. 15 फेब्रुवारी रोजी दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटोही खूप व्हायरल झाले. रेड बनारसी साडीत दीयाचा ब्राइडल लूक बर्‍याच दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. हे लग्न इतर अनेक कारणांमुळे चर्चेत होते. खासकरुन लेडी पंडितमुळे. त्याचबरोबर दीड महिन्यानंतर दीया आणि वैभवने ही गुड न्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे.

मालदीवमध्ये हॉलीडे करतेय एन्जॉय

दीया सध्या पती वैभव आणि मुलीसह मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. अलीकडेच त्यांनी सुट्टीतील बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिचे पती मुलीशी असलेले बॉंडिंग दिसत होते. त्याचवेळी दीयाने बेबी बंपसोबत शेअर केलेले फोटो मालदीवचेेच आहे.