आठवड्या नंतरही ‘त्या’ मुलीचे मारेकरी मोकाट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी रमाबाईनगर येथून मागच्या सोमवारी (दि.२४ सप्टेंबर) सायंकाळी घरा समोरून सात वर्षाच्या मुलीचे अपहरण झाले. पोलिसांना तीन दिवसात शोध घेता आली नाही, गुरुवारी सकाळी एच ए मैदानावरील खदाणात मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचा खून करून आरोपी फरार झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेला एक आठवडा होऊन देखील आरोपी मोकटाच आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी स्पष्ट दिसत असताना आरोपी मिळत नसल्याने तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

धनश्री पुणेकर (७, रा. रमाबाईनगर, पिंपरी) या मुलीचा खून झाला आहे. धनश्री ही सोमवारी सायंकाळी घरासमोर खेळत होती. खेळत असताना अचानक ती सायंकाळी पाचच्या सुमारास बेपत्ता झाली. पालकांनी तिचा शोध नातेवाइक व परिसरात घेतला, मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे पिंपरी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6508e732-c647-11e8-b14c-cf04a24711df’]
पिंपरी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतला आणि शोध घेतला. मात्र मुलगी त्यांना सापडली नाही. दोन दिवसात पोलिसांना बेपत्ता मुलीचा शोध घेता आला नाही. गुरुवारी सकाळी एच ए मैदानावर एका मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाहणी केली असता ती बेपत्ता झालेल्या धनश्रीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले.

डोक्यात पेव्हरब्लॉक घालून भरदिवसा एकाची हत्या

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केला. डॉक्टर अहवालानुसार मुलीच्या डोक्यात मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुलीचे डोके आपटून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

[amazon_link asins=’B014CLL3KS,B07437YHXP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’793627f1-c647-11e8-8e27-4fe3d1288118′]
शेजारी राहणाऱ्याने त्या मुलीचे अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर असल्याचे सांगितले जात आहे, मात्र आठवडा होऊन देखील मारेकरी मोकाट आहेत.

बदलापूरात माथाडी संघटनेच्या पदाधिका-यावर गोळीबार

जाहिरात