‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस योगा’चा सोशलवर ‘बोलबाला’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलिवूडमध्ये टॉपलेस योगाचा ट्रेंड सुरु असल्याचं दिसत आहे. नुकताच टीव्ही अ‍ॅक्ट्रेस एबिगेल पांडेने टॉपलेस योगा करतानाचे फोटो सोशलवर शेअर केले होते. यानंतर आता आशका गोराडियानेही टॉपलेस योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. आशकाने इंस्टाग्रामवरून तिचे हे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

आशकाचे टॉपलेस योगाचे फोटो पाहून चाहतेही सोशलवर तिचे खूप कौतुक करताना दिसत आहेत. आतापर्यंत हजारो चाहत्यांनी आशकाच्या फोटोवर कमेंट करत तिचे फोटो लाईक केले आहेत.

आशकाने याआधीही तिचे काही योगा करतानाचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पती ब्रेंट ग्लोब सोबत योगा करताना दिसत आहे. तिचे पतीसोबतचेही फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत.

आशका आधीपासून आपल्या सौंदर्याची आपल्या फिटनेसची खूप काळजी घेत आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. आशकाबद्दल अधिक सांगायचे झाले तर ती टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस सीजन 6 मध्येही दिसली आहे.

डायन या टीव्ही शोमध्ये सध्या आशका दिसत आहे. आशकाच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर लाँग टाईम रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने विदेशी बॉयफ्रेंड ब्रेंट ग्लोबसोबत लग्न केले.

आशका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिवाय आपले योगा करतानाचे आणि इतर फोटो नेहमीच ती चाहत्यांसाठी शेअर करत असते.