वाढत्या वयात महिलांना जाणवतात ‘या’ 3 मोठ्या समस्या ! दुर्लक्ष न करता घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जसजसं वय वाढतं तसतसं अनेक तक्रारी जाणवायला लागतात. खास करून महिलांना. यात डायबिटीज आणि हाड कमकुवत होणं अशा काही समस्या आहेत. परंतु अशा अनेक समस्यांपासून बचावही केला जाऊ शकतो. जाणून घेऊयात समस्या आणि त्यावरील उपाय

1) डायबिटीज – शरीरातील साखर वाढल्यानं ही समस्या उद्भवते. यासोबतच हृदयाशी संबंधित आजार, किडीनीचे विकार, स्मरणशक्ती कमजोर होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं अशाही समस्या येतात.

अशी घ्या काळजी

– साखरंच नाही तर तेल आणि मिठाचंही अतिसेवन टाळावं.
– ड्रायफ्रुट्स खावेत.
– फळे आणि भाज्या खाव्यात.
– आहारात डाळींचा समावेश असावा.

2) हृदयाचे आजार – जास्त कोलेस्ट्रॉल असणारे पदार्थ खाल्ल्यानं हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल लेवल वाढली तर धमण्याही ब्लॉक होतात. पस्तीशीनंतर नीट लक्ष देणं गरजेचं आहे.

अशी घ्या काळजी

– आहाराकडे विशेष लक्ष द्यावं
– फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करावं.
– ताजी फळं आणि हिरव्या भाज्या खाव्यात
– रोज सकाळी किमान 30 मिनिटे व्यायाम करावा.
– योगा करावा.

3) हाडांची कमजोरी – वयाच्या पस्तीशी आणि चाळीशीनंतर मोनोपॉजची स्थिती असते. अशात शरीरात हाडांची कमजोरी जाणवते. यामुळं सांधेदुखी, ऑस्टियोपोरोसिस, अर्थरायटिस अशा अनेक समस्या येऊ शकतात.

अशी घ्या काळजी

– संतुलित आहार घ्या
– आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्यावेत.
– हिरव्या पालेभाज्या खाव्यात
– आहारात दूध, दही, ताक, पनीर, चीज, बटर, तूप असे पदार्थ खावेत.
– वजन नियंत्रणात ठेवा. म्हणजे कमीही होणार नाही किंवा वाढणार नाही याची काळजी घ्यावी.