पाकची ढवळाढवळ संपेना ! भारताच्या हद्दीत पुन्हा ड्रोन 

बीकानेर : वृत्तसंस्था – भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. आज शनिवारी देखील भारताने हेरगीरी करणारे ड्रोन पडले आहेत. हे ड्रोन नक्की कुठे पडले याचा शोध घेतला जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर सेक्टरमध्ये भारतीय सीमा सैन्याने पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला. आज सकाळी राजस्थानमधील श्रीगंगासागर हिंदूमलकोट सीमारेषेजवळ सकाळी हे ड्रोन पाडलं गेलं आहे. भारतावर हेरगिरी करण्यासाठी हे ड्रोन वापरले गेले होते. भारतीय हवाई दलाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर वायुसेनेने यावर कारवाई केली. पण, याबाबत अद्याप अधिकृत माहिती वायू दलाने दिली नाही. दरम्यान गोळ्यांचे आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती.

सटे कोनी आणि खातलाबना या गावांजवळ ड्रोन पडलं असावा असा अंदाज आहे. दरम्यान, गावकऱ्यांना याबद्दल काही माहिती मिळाल्यास कळवावी. तसेच संशयास्पद वस्तुला हात लावू नये असं आवाहन लष्करानं केलं आहे. यापूर्वी देखील भारतानं पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत.

भारतामध्ये ड्रोनची घुसखोरी
यापूर्वी ४ मार्च रोजी देखील पाकिस्तानकडून भारतीय वायु क्षेत्रामध्ये घुसखोरी करण्यात आली. त्यावेळी ४ मार्च रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास राजस्थान स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. सीमेजवळ एक अज्ञात विमान उडताना दिसलं. याची माहिती मिळताच भारतीय वायुदलाकडून हे विमान पाडण्यात आलं.

भारतीय वायुदलाच्या सुखोई लढाऊ विमानातून मिसाईल सोडून त्याला खाली पाडण्यात आलं. ड्रोनसारखं दिसणारं हे मानवरहित विमान पाकिस्तानच्या फोर्ट अब्बास परिसरात कोसळलं. जे बाहवलपूरजवळ आहे. या कोसळल्या विमानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ट्विटवर ट्वीट करण्यात आले होते.

गुजरात सीमेजवळ देखील पाकची हेरगिरी
२६ फेब्रुवारीला देखील एअर स्ट्राईकनंतर पाकिस्ताननं भारतात हेरगिरीचा प्रयत्न केला. पण, गुजरातमधल्या पाकिस्तान जवळच्या कच्छ सीमेवर भारताने पाकिस्तानचं ड्रोन पाडलं.