‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितनं सुरू केलं ‘YouTube’ चॅनल, ‘व्हिडीओ’ शेअर करत म्हणाली… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आलिया भट्टनंतर आता बॉलिवूडची एव्हरग्रीन स्टार माधुरी दीक्षितनेही आपला युट्युब चॅनल लाँच केला आहे. माधुरी नेने नावाने तिने आपला चॅनल सुरू केला आहे. माधुरीने आपल्या चॅनलवर पहिला डान्सचाच व्हिडीओ शेअर केला आहे. हा डान्स माधुरीचा आयफा अवॉर्डमधील आहे. त्यावेळी माधुरीने आपल्याच एक से बढकर एका गाण्यावर डान्स केला होता. माधुरीचं त्यावेळी खूपच कौतुक झालं होतं. व्हिडीओत तिने छोट्या छोट्या झलक दाखवल्या आहेत.

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये माधुरी म्हणते, “मी माझा पहिला युट्युब व्हिडिओ शेअर करताना आणि तुमच्यासोबत हा प्रवास सुरू करताना खूपच एक्सायटेड आहे. IIFA 2019 खरंच खूप शानदार अनुभव होता. मी खूप खुश आहे की, मला माझी फेवरेट कोरियोग्राफर आणि गुरू सरोज खानजीकडून स्पेशल परफॉर्मंसद्वारे ट्रिब्युट देण्याची संधी मिळाली. मी आशा करते की, तुम्हाला माझा व्हिडीओ आवडेल. प्लीज लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सब्सक्राईब करायला विसरू नका.”