अखेर आमदार अरुण जगताप पोलिसांना शरण 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी आमदार जगताप अखेरीस आज स्वतः पोलिसांना शरण आले आहेत . त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. आज दुपारीच जगताप यांना न्यायालयासमोर हजार करण्यात येणार आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात गेल्या तीन महिन्यापासून आमदार अरुण जगताप फरार होता. आज अखेरीस ते पोलिसांना शरण आले आहेत.

[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’091517af-866b-11e8-981f-1d2c6f342569′]

काय आहे प्रकरण

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले होते. त्यानंतर आमदार जगताप यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसून, त्यांना सोडून देण्याची मागणी करत जगताप समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात अक्षरशः धुडगूस घातला होता. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करत आमदार संग्राम जगताप यांना पळवून नेण्यात आले होते. कार्यालयाचे दरवाजे लाकडी दांडक्याने तोडून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. आमदार अरुण जगताप व इतर जगताप समर्थकांनी पोलीस अधिक्षक कार्यालयावर हल्ला करून आमदार संग्राम यांना पळवून नेले होते.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. पोलीस नाईक संदीप घोडके यांना मारहाण झाली. घोडके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, सचिन जगताप, स्वर्गीय कैलास गिरवले, कुमार वाकळे, निखिल वारे यांच्यासह २५० ते ३०० जणांवर भा. दं. वि. कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४, सार्वजनिक विद्रुपीकरण कलम ३, ७ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनाच्या गुन्ह्यात आमदार संग्राम जगताप अटकेत असल्यापासून त्यांचे वडील आमदार अरुण जगताप हे फरार होते. त्यानंतर आज आमदार अरुण जगताप पोलिसांना शरण आले आहेत .