कार अपघातात जावेद अख्तरांना एकही ‘जखम’ नाही झाली, ‘सत्य’ आलं समोर

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी शनिवारी रोड अपघातात गंबीर जखमी झाली. मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर त्यांची कार एका ट्रकला जाऊन धडकली. अपघातानंतर त्यांना घाईघाईने जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशी अफवा पसरली होती की शबाजा आझमीचे पती जावेद अख्तरदेखील या कारमध्ये होते पण त्यांना काहीच इजा झाली नाही.

आता या प्रकरणाचे सत्य समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, जावेद अख्तर आपल्या वैयक्तिक वाहनातून वेगळे प्रवास करत होते. त्यांची कार शबाना आझमीच्या कारच्या मागे काही अंतराने धावत होती. याच कारणास्तव ते या अपघातातून बचावले.

शबाना आझमींच्या नाकाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना प्रथम नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गंभीर जखमी शबाना आझमी यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

या अपघातात कार चालकही जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. हा अपघात खालापूर टोलनाक्याजवळ घडला असून तिथे शबाना आझमींच्या कारने ट्रकला जोरात धडक दिली.

या अपघाताची बातमी समजताच लोकांनी शबाना आझमीच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरवात केली. सोशल मीडियावर लोक सतत त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. बॉलिवूड स्टार्स शबाना आझमींची विचारपूस करण्यासाठी लोक रुग्णालयात सतत जात आहेत. फरहान अख्तर, अनिल कपूर, सतीश कौशिक, तब्बू आणि शंकर महादेवन यासारखे कलाकार शबाना आझमींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like