ऐश्वर्या राय-जया बच्चन यांची झाली ‘कोरोना’ टेस्ट, रिपोर्ट निगेटिव्ह

नवी दिल्ली : अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. अमिताभ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची आणि स्टाफची टेस्ट करण्यात आली, ज्यामध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आहे. ही बातमी कुटुंब आणि फॅन्ससाठी आनंदाची आहे. मात्र, अजूनही अन्य कुटुंबियांचा आणि घरातील स्टाफचा टेस्ट रिझल्ट येणे बाकी आहे.

अभिषेक आणि अमिताभला कोरोना

अभिषेक बच्चनची डेब्यू वेब सीरीज ब्रीद इंटू द शॅडोज 10 जुलैला रिलिज झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून अभिषेक या वेब सीरीजच्या डबिंगसाठी स्टूडियोत येत आहे. त्यास अनेकदा डबिंग स्टूडियोच्या बाहेर मास्क लावलेल्या स्थितीत स्पॉट केले गेले. अभिषेकने आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे वृत्ताला ट्विट करत दुजोरा दिला आहे. त्याने म्हटले आहे की, अमिताभ यांच्याप्रमाणे तोही नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.

शनिवारी रात्री उशीरा अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले. 77 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी स्वत: आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. तसेच त्यांचे कुटुंब आणि स्टाफची कोरोना टेस्ट केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबाची कोरोना टेस्ट

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले आहे. हॉस्पिटल अथॉरिटीजला सांगितले आहे. कुटुंब आणि अन्य स्टाफच्या टेस्ट होत आहेत. रिपोर्टची प्रतिक्षा आहे. मागील 10 दिवसात जे लोक माझ्या जवळ होते, त्या सर्वांना विनंती आहे की, कृपया आपली टेस्ट करून घ्यावी.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची बातमी आल्यानंतर बॉलीवुडच्या स्टार्सचे ट्विट येऊ लागले आहेत. फॅन्स आणि सेलेब्स मिळून या दोघांच्या सुरक्षेसाठी आणि लवकर बरे होण्याची शुभेच्छा देत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like