BMC नं रेखाच्या बंगल्याजवळील झोया अख्तरचाही बंगला केला सील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूडमधील सेलिब्रिटी देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री रेखालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक जोय आख्तर यांचा बंगला सील केला आहे. बीएमसीने संक्रमणाची माहिती मिळताच जोय आख्तर यांच्या बंगल्याबाहेर पोस्टर देखील लावले आहे.

अभिनेत्री रेखाच्या बंगल्याच्या शेजारी बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला आहे. त्यामुळे महापालिकेने दक्षतेसाठी कारवाई केली आहे. अद्याप झोया अख्तर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.

रेखाच्या अगोदर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीच्या स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानंतर कलाकारांनासुद्धा क्वारंटाईन व्हावे लागले आहे. अभिनेता आमीर खानने आपल्या कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते.

आमिरने सांगितले होते की, माझे कुटुंब, घरामधील बाकीचे कर्मचारी आणि माझीही कोरोनाची चाचणी घेतली, जी निगेटिव्ह आली आहे. परंतु आम्ही अजूनही खबरदारी घेतोय. मला आणि माझ्या कुटुंबीयांकडून बीएमसीचे आभार, ज्याने आम्हाला मदत केली आणि आम्हाला मार्ग दाखविला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like