‘बिग बी’ अमिताभनं सांगूनही उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली ‘ही’ मोठी चूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवारांनी कवितादेखील सादर केली होती. त्यांच्या कवितांना उपस्थित आमदारांकडून चांगली दाद मिळाली. परंतु असं करत असताना अजित पवारांकडून एक मोठी चूक झाली.

विधिमंडळात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केल्यानंतर अजित पवार यांनी,

‘असफलता एक चुनौती है, स्वीकार करो,

क्या कमी रह गई, देखो और सुधार करो’

अशी कविता सादर करत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार असं म्हटलं होतं. ही कविता हरिवंशराय बच्चन यांची असल्याची पवारांनी यावेळी म्हटल होत. सर्वसामान्यांचीही अशीच समजूत आहे कि ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ ही कविता हरिवंशराय बच्चन यांचीच आहे. मात्र ही सुप्रसिद्ध कविता कवी सोहनलाल द्विवेदी यांनी लिहिली आहे.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सगळ्यांना माहिती देताना सांगितलं होतं कि, ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती’, बर्‍याच लोकांना ही कविता बाबूजींनी लिहिली असल्याचं वाटतं. मात्र ही कविता माझ्या वडीलांनी लिहिलेली नाही. तर या कवितेचे कवी सोहनलाल द्विवेदी आहेत.