‘बिग बी’ नंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट ‘हॅक’

नवी दिल्ली : अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता गायक अदनान सामीचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले अगदी त्याच प्रकारे अदनान सामी यांचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे.
https://twitter.com/AdnanSamilive?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Eauthor

डीपीला लावला इम्रान खान यांचा फोटो
हॅकर्सने अदनान सामी यांच्या ट्विटर अकाउंटवरील डीपी बदलून त्या जागी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो लावला आहे. याचसारखा प्रकार अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करताना करण्यात आला होता.

हॅकर्सकडून धमकी
अदनान यांच्या ट्विटर अकाउंटवर हॅकर्सनी काही ट्विट देखील केले आहेत. यामधील एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, जो कोणी आमचा देश पाकिस्तानला धोका देईल त्यांच्या एक गोष्ट लक्षात असू द्या की त्यांच्या ट्विटरवरील प्रोफाइल फोटोमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो आणि पाकिस्तानच्या झेंड्याचा फोटो लावण्यात येईल. अशी धमकी देखील हॅकर्सकडून देण्यात आली आहे.

हॅकर्सनी जाहीर केली स्वतःची ओळख
एवढेच नाही तर हॅकर्सनी स्वतःची ओळख देखील सांगितली आहे. त्यांनी लिहिले की, तुमचे अकाउंट तुर्कीची सायबर आर्मी Ayyıldız Tim ने हॅक केले आहे. तुमच्या महत्वाच्या चर्चा आणि महत्वाची माहितीला देखील हॅक करण्यात आले आहे.

पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना १ जानेवारी २०१६ ला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like