‘मैं दुबे हूं…कानपुर वाला,’ असे ऐकताच पोलिसांनी पोलिसांनी विकासच्या कानशिलात ठेवली (व्हिडिओ)

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था –  मध्य प्रदेशच्या उज्जैन पोलिसांनी आज अटक केल्यानंतरही उत्तर प्रदेशचा कुख्यात हिस्ट्रीशीटर विकास दुबेचा रुबाब गेलेला नाही. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबेला सकाळी महाकाल पोलिस स्टेशन भागातील परिसरातून अटक केली, जेव्हा तो कथितपणे महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात होता.

अटक केल्यानंतर पोलिस कर्मचारी त्याला गाडीत बसवत असताना तो गर्दीकडे वळून म्हणाला, मी विकास दुबे आहे, कानपूरचा. मात्र, पोलिसांनी थप्पड मारून त्याचा सगळा रुबाब बाहेर काढला. या घटनेचा व्हिडिओ त्वरित व्हायरल झाला.

याच दरम्यान विकासच्या काही साथीदारांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त होते, परंतु वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची खातरजमा केलेली नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विकास दुबेची येथील पोलिस अधीक्षकांकडून विचारपूस केली जात आहे. विकासच्या अटकेसंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप शिल्लक आहेत. आतापर्यंत हेही समजलेले नाही की, विकास दुबे मध्य प्रदेशातील उज्जैनला कधी आणि कसा पोहोचला. त्याच्या एका नातेवाईकाला उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी शहडोल जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.