‘चिखलफेक’ प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे म्हणतात, ‘अपना भी टाईम आयेगा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घातल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या काँग्रेस आमदार आणि त्यांच्या १८ समर्थकांना काल अखेर जमीन मिळाला. जामिनावर बाहेर आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना टोला मारत म्हटले कि, हे आंदोलन बाकी कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच आवडलं असतं. त्यामुळे या प्रकारानंतर पून्हा एकदा नितेश राणे यांनी दीपक केसरकर यांना डिवचले आहे.

जामीन मिळाल्यानंतर त्यांना दर रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरीसाठी यावे लागणार आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले कि, या निमित्ताने मला दर रविवारी कणकवलीला यायला मिळेल आणि या निमित्ताने मला प्रचार देखील करायला मिळेल. पुढे बोलताना नितेश राणे यांनी म्हटले कि, मी अन्याय सहन करणारा नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी जनतेला त्रास होईल त्या ठिकाणी मी कारवाई करणारच. त्याचबरोबर आम्हाला शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील पाठिंबा दिला होता. त्यामुळे आम्ही केलेलं आंदोलन लोकांसाठी होते. त्यामुळे आम्ही अजिबात घाबरणार नाही.

दरम्यान, त्यांना अटक केल्यानंतर मागील १० दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर ‘अपना भी टाईम आयेगा’ असा डायलॉग मारत त्यांनी गृहमंत्री दीपक केसरकर त्यांच्यावर कुरघोडी केली.

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

 

Loading...
You might also like