‘चिनी’ अ‍ॅप्सनंतर आता ‘मोबाईल हँडसेट’ वर देखील घातली जाऊ शकते ‘बंदी’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सरकारकडून चीनी अ‍ॅप्स नंतर आता चिनी मोबाईल हँडसेटवरही बंदी घातली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, डिजिटल कम्युनिकेशन कमिशन 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत डेटाची गोपनीयता व सुरक्षा शिफारशींना मान्यता देऊ शकेल.

कंपन्यांना डेटा संरक्षणाची जबाबदारी घ्यावी लागेल

ट्रायच्या शिफारशीनुसार हँडसेट कंपन्यांना ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. ट्रायने 2018 मध्ये याची शिफारस केली होती. ट्रायकडून डेटा सुरक्षेची गोपनीयता, मालकी बद्दल शिफारस करण्यात आली होती. आयसीएने ट्रायच्या शिफारशींना विरोध केला होता. या शिफारशीत असे म्हटले गेले होते की अ‍ॅप्स, ऑपरेटिंग सिस्टम, मोबाईल हँडसेटला ग्राहकांच्या डेटाचे रक्षण करावे लागेल. कंपन्यांना त्यांचे सर्व्हर भारतात स्थापित करावे लागतील. भारताच्या 74% बाजारावर चिनी हँडसेटचा ताबा आहे.

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कोणतेही नियमन नाही

दरम्यान, ट्रायने फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या ओटीटी अ‍ॅप्सविषयी म्हटले आहे की त्यांच्या नियमना (रेगुलेट) साठी मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता नाही. तथापि, त्यांनी या अ‍ॅप्सवर देखरेख ठेवण्याचा आग्रह धरला आहे जेणेकरून आवश्यकतेनुसार ते रेगुलेट केले जाऊ शकतात. ट्रायचे म्हणणे आहे की त्यांचे नियमन करणे योग्य होणार नाही. बाजारच त्यांना रेगुलेट करतो.

ट्रायने त्यांचे नियमन केल्यास त्याचा उद्योगांवर वाईट परिणाम होईल. ट्राय म्हणाले की त्यांना मॉनिटर करण्याची आवश्यकता आहे नियमन करण्याची नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच या अ‍ॅप्सवर कारवाई केली पाहिजे. याशिवाय ओटीटी अ‍ॅप्सच्या गोपनीयता, सुरक्षेमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही.