After Breakup | 85 वर्षांच्या आजीचा तरुण प्रियकराने केला प्रेमभंग, आता डेटिंग साईटवर ‘ही’ महिला बिनधास्त शोधतेय नवे प्रेम

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – After Breakup | प्रेमाला वय नसते. ते तर कुणालाही, कधीही होऊ शकते. प्रेमाच्या शोधासाठी आता अनेक डेटिंग साईट्स (Love On Dating Sites) मार्केटमध्ये आल्या आहेत. या साईट्सद्वारे लोक आपल्यासाठी लायक पार्टनर शोधतात. अशाच एका डेटिंग साईटवर न्यूयॉर्क (New York) मध्ये राहणार्‍या 85 वर्षांची ग्लॅमरस आजी आपला नवीन पार्टनर शोधत आहेत. हॅट्टीचा अलिकडेच आपल्या 39 वर्षाच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झाला आहे. यानंतर आता ती स्वताला सावरण्यासाठी नवीन पार्टनर शोधत आहे. (Old Woman On Dating Site). हॅट्टीला विश्वास आहे की, लवकरच तिला खरे प्रेम मिळेल.

85 वर्षांची हॅट्टी यापूर्वी 39 वर्षाच्या एक व्यक्तीला डेट करत होती. परंतु अलिकडेच तिचे ब्रेकअप झाले. कारण त्याचे दुसर्‍या मुलीशी सुत जुळले हाते. यामुळे हॅट्टीचे मन खुपच दुखावले. परंतु काही दिवस रडल्यानंतर आता हॅट्टी पुन्हा डेटिंगसाठी तयार आहे. तिने बंबल नावाच्या डेटिंग अ‍ॅपवर आपले प्रोफाईल बनवले आहे आणि आपल्यासाठी नवीन पार्टनर शोधत आहे. या महिलेचे जीवन वृद्धत्व पेन्शनवर जगत आहे. परंतु, तरीही ती आपल्या पार्टनरवर भरपूर पैसे उधळते.

 

घटस्फोटानंतर (Divorce) बदलले जीवन

हॅट्टीचा घटस्फोटा 48 वर्षाच्या वयात झाला होता. या विवाहाने तिचा मोठा कालखंड बरबाद झाला होता. या कारणामुळे हॅट्टीने तेव्हाच निर्णय घेतला होता की, आता ती केवळ तरुण मुलांनाच डेट करेल. आपला कॉन्फिडन्स आणि बिनधास्त लुकमुळे ती आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या तरूणांना सुद्धा आकर्षित करते. अजूनही ती सिंगल आहे. मात्र, हॅट्टीने सांगितले की, डेटिंग अ‍ॅपवर (Dating app) काही तरूण भेटले आहेत पण ती कुणालाही डेट करत नाही. सध्या ती सर्वांशी बोलत आहे, ज्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. डेटींग अ‍ॅपवर इस्त्रायलच्या एका व्यक्तीने हॅट्टीला रिक्वेस्ट पाठवली आहे. एक्सरसाइज आणि डाएटमुळे हॅट्टी एकदम फिट आहे.

Web Titel :- After Breakup 85 year old grandmother looking for new young love on dating sites

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Fire at CBI office । दिल्लीतील CBI मुख्यालयाला आग; अधिकारी बाहेर पळाले, 5 अग्निशमन गाड्या दाखल

Sanjay Raut | नारायण राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर

प्रकृती बिघडल्याने खडसेंची पत्रकार परिषद रद्द ! ईडीच्या चौकशीला हजर राहणार काय याकडे लक्ष