आता एसएमएस आणि कॉलिंगसाठी अतिरिक्त चार्ज नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यापूर्वी सण किंवा महत्वाच्या प्रसंगी मोबाईल कंपन्या ग्राहकांना अतिरिक्त चार्ज आकारत होत्या. आता ग्राहकांना ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी पासून एसएमएस आणि कॉलिंगसाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. कारण BSNL नंतर आता व्होडाफोन-आयडियानेही आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने ब्लॅकआऊट डेज पूर्णपणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता मोठे प्रसंग आणि सणांनाही आपले रिचार्ज पॅक्स आणि एसएमएस पॅक्सचा लाभ घेता येणार आहे. २०१९ मध्ये येत्या वर्षात सण किंवा एखाद्या विशेष दिवशी कॉल किंवा एसएमएसच्या बदल्यात कोणताही अतिरिक्त चार्ज घेतला जाणार नाही.
उदाहरणार्थ  –
जर पूर्वी ग्राहकाने एसएमएस पॅकही घेतला असेल ब्लॅकआऊट डेजच्या दिवशी ग्राहकांना मुख्य शिल्लक असलेल्या रकमेतून चार्ज द्यावा लागत होता. आता कंपनीने घोषणा केल्यानंतर संदेश पाठविण्यासाठी मुख्य शिल्लक रकमेतून चार्ज द्यावा लागणार नाही. तर आता संदेश पॅकमधूनच मेसेज पाठविता येणार आहे.
ब्लॅकआऊट डेज –
टेलिकॉम कंपन्या मोठे सण किंवा प्रसंगला ‘ब्लॅकआऊट डे’ज मानतात उदा . होळी, दिवाळी.
या दिवसांत युजर्सला संदेश आणि कॉलिंगसाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागतो. म्हणजेच ग्राहकांना स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स किंवा संदेश पॅक्सचा या दिवशी वापर केला जात नाही. टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, बीएसएनएलच्या या घोषणेनंतर आता ग्राहकांना कोणत्याही ब्लॅकआऊट डेच्या दिवशी वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही.

व्होडाफोन , आयडियाकडून ब्लॅकआऊट डेज रद्द केले जाणार आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. रिलायन्स जिओ ब्लॅकआऊट रद्द करणारी पहिली टेलिकॉम कंपनी आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये आपली सेवा सुरू केल्यानंतर Reliance Jio ने ब्लॅकआऊट डेज रद्द केले होते.