पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू; पोलीस निरीक्षकासह 4 जणांवर CID कडून FIR

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात झालेल्या वादाची व्हिडीओ शुटींग काढण्याच्या कारणावरुन भारतीय युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली. ही घटना ताजी असतानाच गोंदियामध्ये एका आरोपीचा पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) एका पोलीस निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन दिली आहे. तसेच त्यांनी पोलिसांच्या कामावर सवाल उपस्थित केला आहे.

आमगाव तालुक्यातील आरोपी राजकुमार अभयकुमार धोती (वय-30 रा. कुंभारटोली) याचा पोलीस कोठडीत 22 मे रोजी पहाटे सव्वापाच वाजता मृत्यू झाला. राजकुमार याला पोलिसांनी लाकडी दांड्याच्या पट्ट्याने मारहाण केली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद राज्य गुन्हे अन्वेषण विभाग गोंदियाचे पोलीस निरीक्षक विनोद बाळकृष्ण वाकडे (वय-38) यांनी दिली आहे. त्यानुसार तत्कालीन नेमणुकीचे पोलीस निरीक्षक सुभाष सदाशिव चव्हाण (वय-41), सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर शिवाजी जाधव (वय-40), चालक पोलीस हवालदार खेमराज मार्कंड खोब्रागडे (वय-52), पोलीस शिपाई अरुण देवाजी उके (वय-33), दत्तात्रय ज्ञानोबा कांबळे (वय-30) यांच्या विरोधात भा.द.वी. कलम 302,330,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालन्यानंतर गोंदियाचा प्रकार समोर आल्यानंतर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन पोलिसांच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जालना मारहाण प्रकरणानंतर गोंदिया पोलिसांचा एक प्रताप समोर आला आहे. आमगाव तालुक्यातील आरोपी राजकुमारचा पोलिसांनी लाकडी दांडा असलेल्या पट्ट्याने मारहाण करत जीव घेतला. पोलिस निरीक्षक व इतरांवर CID ने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचा IPC/CRPC वर विश्वास राहिला नाही का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

Also Read This : 

‘या’ ९ पदार्थांनीसुद्धा दूर करा कॅल्शियमची कमतरता, जाणून घ्या

 

पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

TATA ग्रुपने बिग बास्केटमध्ये खरेदी केली मोठी भागीदारी, Amazon आणि Flipkart ला मिळणार ‘टक्कर’

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जुन्या नावाने नवीन औषधे विकण्यास केंद्राची बंदी