काय सांगता ! होय, चलन केलं म्हणून त्यानं चक्‍क पोलिस ठाण्याची लाईट कट केली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मेरठ पोलिसांना एका इंजिनियरला दंड करणे चांगलेच महागात पडले आहे. त्यामुळे प्रचंड रागावलेल्या ज्युनियर इंजिनियरने एका पोलीस चौकीची आणि पोलीस स्टेशनची वीज बंद केली. यामुळे पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागला. सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Meerut Police Station
व्हिडिओतील घटना हि मेरठमधील पोलीस ठाण्यातील आहे, सध्या या ठाण्यात विजेची कोणतीही व्यवस्था नाही. वीजबिल न भरल्यामुळे लाईट कापण्यात आल्याचे बोलले जात होते, मात्र एका इंजिनियरला दंड केल्याने त्याने विजेची जोडणी तोडल्याने पोलीस स्टेशनमध्ये वीज नव्हती. सोम प्रकाश गर्ग असे या इंजिनियरचे नाव असून तो त्याच्या वाहनावरून जात असताना पोलिसांनी त्याला दंड केला होता. त्याने आपण सरकारी वीज विभागात कार्यरत असल्याचे देखील पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्याचे काहीही न ऐकता त्याला दंड केला. मात्र यामुळे संतापलेल्या गर्ग याने सरळ वीजबिल न भरलेल्या या पोलीस स्टेशनची सरळ वीज कापून टाकली. त्यामुळे चार तासांपेक्षा अधिक काळ वीज न आल्याने शेवटी उच्च अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करत केल्यानंतर पोलीस स्टेशनची लाईट सुरु कार्यात आली. मात्र चौकीची लाईट सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे वीज विभागातील अधिकाऱ्यांनी देखील इंजिनीयरचे समर्थन करताना या चौकीचे 1,67,000 रुपये बिल बाकी असल्याचे सांगितले. मात्र हि कारवाई केवळ योगायोग असल्याचे वीज विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याचे चलन काढल्याने त्याने सूडबुद्धीने हि कारवाई केली असे गृहीत धरले तरी या विभागातील फक्त एकाच पोलीस ठाण्यातील वीज कापण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Visit – policenama.com