छगन भुजबळ मंत्री बनले अन् खड्ड्यांना ‘अच्छे दिन’ आले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ कॅबिनेट मंत्री झाले आणि खड्ड्यांना अच्छे दिन आले असं म्हटलं जात आहे. कारण औरंगाबाद महामार्गावरील शिवरे फाट्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. यानंतर काही वाहन चालक असं बोलताना आढळून आले की, आता छगन भुजबळ यांचा करिश्मा दिसेल.

लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि निफाड ही गावं मोठी असून लाईफलाईन आहेत. कांद्यासाठी या सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत. कांदा लिलावासाठी रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु येथील रस्त्यांची मात्र दुरावस्था झाली आहे. चालकांसह नागरिकही या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागानंही या रस्त्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. येवला-लासलगाव व निफाड मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. या रस्त्यानं प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावर रस्ता कमी आणि खड्डेच जास्त आहेत. परंतु पर्याय नसल्यानं या मार्गानं प्रवास करावा लागतो.

खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान
या खराब रस्त्यांमुळे अवघ्या 5 किमीसाठी सुमारे अर्धा तास लागतो. चालकही या रस्त्यांना वैगातले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होते. यामुळे वाहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार आपटले आहेत. यातील अनेकांना किरकोळ जखमही झाली आहे.

रस्त्याच्या साईटपट्ट्या गेल्या खोल
य रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईटपट्ट्या रस्त्यापासून सुमारे एक फूट खोल गेल्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो अशी भीती नागरिकांमध्ये आहे. रस्त्यावर मोठी वाहतूक असूनही बांधकाम विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com