झेंडा काढल्यावरुन दोन गटात हाणामारी; दोन पोलिसांसह दहा जखमी

गेवराई ( बीड) : पोलीसनामा आॅनलाईन-

झेंडा काढल्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील गढी पासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या  मारफळ फाट्यावर घडली आहे. यातील एका गटाने या ठिकाणी झेंडा लावला होता. तो काढल्यामुळे दोन गट एकमेकांच्या विरोधात भिडले.
[amazon_link asins=’B07944CZ7M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41ea9d7c-81d2-11e8-afe4-4bebb0e76bcd’]

यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली असून, या मारहाणीत बंदोबस्तासाठी आलेल्या दोन पोलिसांसह दहा जण जखमी झाले आहेत. घटना स्थळावर तणावपूर्ण शांतता असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केल्यामुळे या ठिकाणी फाट्याला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.