मुख्यमंत्र्यांनतर आता ज्योतिरादित्य यांची ऑडिओ क्लीप व्हायरल, तब्बल 50 लाखाबाबत संभाषण

ग्वालियार : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर आता भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपने खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लीप विधानसभा निवडणुकीच्या वेळेची असल्याचं सांगितलं जात असून, या क्लीपमध्ये तिकिटावरुन ५० लाख रुपयांच्या व्यवहाराची चर्चा होत आहे. परंतु, अद्याप कोणीही या ऑडिओ क्लिप बाबत पुष्टी केलेली नाही.

व्हायरल होत असलेल्या या कथित ऑडिओ क्लीपमध्ये अनिता जैन नावाच्या महिलेस तिकीट देण्याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, अशोकनगर भागातून तिला तिकीट मिळाले नाही. तसेच या महिलेने ऑडिओ क्लीपमध्ये अग्रवाल नावाच्या कोणा व्यक्तीस ५० लाख रुपये देण्याची भाषा केली. ऑडिओ क्लीपच्या सुरुवातीस अनिता पहिल्यांदा ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रणाम करते. त्यानंतर दुसऱ्या बाजून शिंदे यांनी माफ करा अनिता, मी यासाठी काय करु शकलो नाही असं म्हणतात.

ऑडिओ क्लीपमध्ये अनिता पुढं म्हणते, महाराज सर्व समाजातील लोक माझ्यासोबत असून, असं पहिल्यांदाच होत आहे की, अशोकनगरची जागा काँग्रेस जिकूं शकते. मी पूर्णरीत्या तयारी केली आहे. तर दुसरीकडे अशोकनगर जागेवरती दुसरे दावेदारबाबत महिला विरोधात सांगते की, तो उमेदवार जिंकणार नाही. अशोकनगरमध्ये त्याच्या विरुद्ध अनेक लोक आहेत. तसेच तिकिटासाठी अनिता रडत रडत आपलं मत मांडत असल्याचं ऐकू येत.

तर अनिता जैन यांना ज्योतिरादित्य शिंदे आश्वासन देताना म्हणतात की, तुम्ही काळजी करु नका, मला माहिती आहे आपलं सरकार बनणार आहे. मी तुमच्या पाठीशी असून, तुम्हाला न्याय आणि सन्मान देऊ. तर दुसरीकडून अनिता या कोणत्या तरी व्यक्तीचं नाव घेत आरोप करते की, तो प्रत्येक निवडणुकीमध्ये हत्या करतो, महाराज बोलतात मला याची कल्पना आहे. तसेच बोलताना शिंदे सांगतात, यावेळी जे लोक ५ हजारांपेक्षा कमीने हारले आहेत त्यांना राहुल गांधी मध्यप्रदेशातून तिकीट देतील, मी प्रयत्न केले पण राहुलजींचे आदेश असल्याने काय करु, असं ते सांगतात

व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लीपवरून मध्यप्रदेशात राजकारण सुरु असताना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी याला बनावट असल्याचं बोललं आहे. तर अनिता जैन यांनी एका वृत्तपत्राला बोलताना म्हटलं की, माझं नाव सर्व्हेमध्ये होत. तिकीट नाकारल्यानंतर महाराजांचा फोन आला. चर्चेवेळी अनेक लोक उपस्थित होते. मी रडत होती आणि फोन आपटून निघून गेली. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांपैकी ही ऑडिओ क्लीप बनवली असेल, असं त्या म्हणाल्या.