कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज देणाऱ्याला NCB कडून अटक ! समोर आली मोठी माहिती

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील ड्रग्स केसचा तपास करणाऱ्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (NCB) कॉमेडियन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsa Limbachiyaa) यांना अटक केली होती. रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) किला कोर्टानं भारती आणि हर्ष यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांकडून जामीन अर्जही दाखल करण्यात आला होता, ज्यावर (सोमवार, दि. 23 नोव्हेंबर) सुनावणी झाली. या सुनावणीनंर आता भारती आणि हर्ष यांचा जामीन एनडीपीएस कोर्टानं मंजूर केला. अशी माहिती होती की, भारतीला गांजा मिळाला होता.

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या बुधवारी रात्री एनसीबीनं सुनील गवई नावाच्या त्या ड्रग पेडलरला अटक केली आहे, जो भारतीला ड्रग सप्लाय करत होता. तो इतरही काही लोकांना ड्रग सप्लाय करत होता. त्यानंच याबाबत खुलासा केला आहे.

ताब्यात घेतलेल्या ड्रग पेडलरनं सांगितलं की, तो डिलिव्हरी बॉय बनून ड्रगचा सल्पाय करत होता. असंही सांगितलं जात आहे की, त्याचं नेटवर्क पश्चिम मुंबईमध्ये जास्त अ‍ॅक्टिव्ह होतं. त्याचे जास्तीत जास्त क्लाएंट्स हे याच भागात आहेत.

You might also like