वादग्रस्त वक्तव्यानंतर निधी चौधरींचे आता ‘घुमजाव’ मी गांधीवादी ; फेसबुकवर नवी पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपण गांधीवादी विचारसरणीच्या असून महात्मा गांधींचे रोजच स्मरण करतो. गांधीजींबाबत आपण केलेले ट्विट हे पूर्णपणे व्यंगात्मक होते आणि या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावला गेला, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिले आहे आणि आधीच्या पोस्टपासून ‘घुमजाव ‘ केले आहे. त्यामुळे हे प्रकरण आता शेकणार हे लक्षात येताच चौधरी यांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे मात्र सोशल मीडिया कसा महागात पडू शकतो याचा धडा यानिमित्ताने सर्वांना मिळाला आहे.

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी यापूर्वी आपण अनेक ट्विट केले आहेत. मी माझ्या प्रसुती रजेदरम्यानही गांधीजींच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित चर्चासत्रामध्ये मी सहभागी झाले आहे. माझ्या मागील कोणत्याही पोस्ट काढून पाहिल्यास त्या महात्मा गांधीचा आदर करणाऱ्याच आढळतील.

मात्र माझ्या या व्यंगात्मक ट्विटचा चुकीचा अर्थ लावला जाईल याचा मी कधीही विचार केला नसल्याचे सांगत चौधरी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. साबरमती असो किंवा पोरबंदर, जळगावाचील जैन सोलारजवळील महात्माजींचे संग्रहालय असो किंवा कोलकाता आणि चेन्नईतील महात्माजीचे वास्तव्य असलेली घरे असोत किंवा मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान असो किंवा गांधीजींशी संबंधित कोणतीही जागा असो

ही सारी ठिकाणे आपल्यासाठी ‘चारधाम’ आहेत, अशा शब्दात चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकदा शांतपणे माझे ट्विट पाहा. काय ती अत्यंत दु:खात लिहिलेली टिप्पणी नाही का?. महात्मा गांधीवर सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी लिहिण्यात येत असलेल्या नकारात्मक टिप्पणींमुळे दु:खी होऊन मी हे ट्विट लिहिले आहे हे स्पष्ट होत नाही का?, असे प्रश्नही चौधरी यांनी उपस्थित केले आहेत.

You might also like